सत्तेत आल्यास भारताला देणार 'ही' मोठी भेट, बायडन यांच्या घोषणेनं ट्रम्पना हादरा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 11:38 AM2020-07-03T11:38:24+5:302020-07-03T11:38:43+5:30
प्रसंगी एच-१बी व्हिसा रद्द करण्याचा निर्णयात बदल करू, असंही बायडन यांनी सांगितलं आहे. ते डिजिटल टाऊन हॉल येथे बोलत होते.
वॉशिंग्टन: कोरोनाच्या संकट काळातही अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत चांगलीच चूरस निर्माण झाल्याचं चित्र आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी डेमोक्रेटिक पक्षाचे नेते जो बायडन यांनी मोठी घोषणा केली आहे. सत्तेत आल्यास भारतासोबत असलेले द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करणार असल्याचं बायडन यांनी जाहीर केलं आहे. तसेच प्रसंगी एच-१बी व्हिसा रद्द करण्याचा निर्णयात बदल करू, असंही बायडन यांनी सांगितलं आहे. ते डिजिटल टाऊन हॉल येथे बोलत होते.
उपस्थितांनी बायडन यांना निवडून आल्यास पहिल्या शंभर दिवसांत तुमचे प्रशासन काय करेल, असा प्रश्न विचारला, त्यावर ते म्हणाले, एच-१बी व्हिसा रद्द करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनानं काही दिवसांपूर्वीच घेतला. माझ्या प्रशासनात त्या नियमात बदल करण्यात येईल, त्यावेळी तो निर्णय नसेल. एच-१बी व्हिसाच्या माध्यमातून आलेल्या लोकांनी या देशाच्या जडणघडणीत मोठा हातभार लावला आहे. देशाच्या उभारणीमध्ये त्यांचंही मोठं योगदान आहे. तसेच असं योगदान देणाऱ्या सुमारे १.१ कोटी स्थलांतरितांना अमेरिकेचं नागरिकत्व देण्यासाठी कायद्यात सुधारणा करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. भारतातल्या आयटी कंपन्यांकडून 'एच-१ बी व्हिसा'ला मोठी मागणी असते. अमेरिकेतील रोजगार तिथल्या स्थानिकांना मिळावा, यासाठी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा व्हिसा वर्षाअखेरपर्यंत रद्द केला आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिंकल्यास अमेरिकेचा नैसर्गिक मित्र असलेल्या भारताबरोबरील सामरिक भागीदारी वाढविण्यास आपले प्रशासन सर्वोच्च प्राधान्य देईल,' असे बायडन म्हणाले आहेत. प्रादेशिक स्तरावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भारतसोबत असणे आवश्यक आहे. भारत-अमेरिका अणुकराराला काँग्रेसची मंजुरी मिळवण्यामध्ये मी भूमिका बजावली आहे, याचा मला अभिमान आहे. निवडून आलो, तर या संबंधांना बळकटी देईन, असंही त्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा
CoronaVirus : लढ्याला यश! भारतात बनवलेली कोरोनावरची पहिली लस 'या' दिवशी येणार बाजारात
जगात मंदी, पण 'या' राज्यात पोलिसांना मिळतेय नोकरीची संधी, ४८ हजारांपर्यंत पगार
आता देशातील १०९ मार्गांवर धावणार १५१ खासगी ट्रेन
कानपूरमध्ये गुंडांच्या गोळीबारात डीएसपीसह 8 पोलीस शहीद
...पण 'त्या' नातवाचे भविष्य काय?, हे चित्र म्हणजे केंद्राची नामुष्की, शिवसेनेचे टीकास्त्र
आजचे राशीभविष्य - 3 जुलै 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना सामाजिक कार्यांतून लाभ होईल