चीनला दणका! अमेरिका तैवानला देणार लढाऊ विमानांची फौज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 08:51 AM2020-08-16T08:51:16+5:302020-08-16T08:54:17+5:30
ही दिवसांपूर्वी चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच मिसाईल डागण्यात आली. यामुळे चीनच्या पायलटांनी मागे परतणे पसंत केले. आता तैवानची ताकद आणखी वाढणार आहे.
तैवानवर कब्जा करू पाहणाऱ्या चीनलाअमेरिका नेहमीच मोठा अडसर ठरत आली आहे. आजही तैवानला अमेरिका रसद पुरवत असल्याने आणि संरक्षण देत असल्याने चीनला तैवान गिळंकृत करण्याची संधी मिळत नाहीय. काही दिवसांपूर्वी चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच मिसाईल डागण्यात आली. यामुळे चीनच्या पायलटांनी मागे परतणे पसंत केले. आता तैवानची ताकद आणखी वाढणार आहे. कारण अमेरिका तैवानला 66 लढाऊ विमाने देणार आहे.
तैवान अमेरिकेच्या एका कंपनीकडून 66 विमाने खरेदी करणार आहे. या करारावर सह्या करण्यात आल्या असून यामुळे चीन भडकण्याची शक्यता आहे. चीन तैवानवर आपला दावा सांगत आहे. यामुळे हा व्यवहार बेकायदेशीर असल्याचा कांगावाही चीन करू शकतो. याआधीही चीनने तैवानच्या शस्त्रास्त्र खरेदीला विरोध दर्शविला आहे.
लढाऊ विमानांच्या खरेदीची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या योजनेला 2019 मध्येच मंजुरी दिली जाणार होती. आता हा व्यवहार 2026 च्या शेवटी पूर्ण होमार असून तैवानला एकूण 90 विमाने विकली जाणार आहेत. यापैकी 66 लढाऊ विमाने असणार आहेत. चीनसोबतचा तणाव पाहून तैवान आपली लष्करी ताकद वाढवू लागला आहे.
गेल्या वर्षी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने वॉशिंग्टनकडे तैवानला लढाऊ विमाने न विकण्याचे तसेच शस्त्रे विक्री रोखण्याची विनंती केली होती. तसेच असे न केल्यास कारवाई करण्याची धमकी दिली होती. तैवानच्या राष्ट्रपती त्साई २०१६ मध्ये सत्तेवर आल्या आहेत. त्यांनी चीनच्या वन चायना पॉलिसीचा विरोध केला आहे. यामुळे चीनने लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे. यामुळे चीन अधुनमधून लढाऊ विमाने आणि युद्धनौका तैवानच्या क्षेत्रात पाठवत असतो.
चीनला तैवान का हवेय?
तैवानच्या खाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर पेट्रोकेमिकल आणि अन्य मिनरलचा मोठा साठा आहे. तैवानवर कब्जा केल्यास या भागात एक मोठा न्युक्लिअर रिएक्टरही निर्माण करण्याची चीनची योजना आहे. आता जागतिक तज्ज्ञांनुसार साऊथ चायना समुद्रात युद्धासारखी परिस्थिती तयार होणार आहे. यामध्ये चीनविरोधात तैवानच्या बाजुने अमेरिकाच नाही तर रशियाही सहभागी होण्याची शक्यता आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
SBI मध्ये विनापरीक्षा नोकरीसाठी अर्ज केला का? उद्या शेवटचा दिवस
EPFO मध्ये भ्रष्टाचार; कंपनीकडून 8 लाखांची लाच घेताना सीबीआयची धाड
Video: पुणे! "तुमच्या राज्यात विनापरवानगी आलो"; राज्यपालांची अजित पवारांना कोपरखळी
Independence Day : मुलींचे लग्नाचे वय बदलणार; पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून दिले संकेत
Independence Day : मोठी घोषणा! नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन आजपासून सुरु; पंतप्रधानांनी सांगितला फायदा