अमेरिका उत्तर कोरियावर कारवाईच्या तयारीत
By admin | Published: March 5, 2017 01:55 PM2017-03-05T13:55:46+5:302017-03-05T13:55:46+5:30
उत्तर कोरियाकडून करण्यात आलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे परीक्षण आणि मलेशियात हुकूमशहा
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 5 - उत्तर कोरियाकडून करण्यात आलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे परीक्षण आणि मलेशियात हुकूमशहा किम जोंग उनच्या सावत्र भावाची झालेली हत्या या पार्श्वभूमीवर अमेरिकेने कोरियावर लष्करी कारवाई करण्याची योजना आखली आहे.
अमेरिका उत्तर कोरियावर थेट कारवाई करू शकते, असे वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तात म्हटले आहे. या वृत्तानुसार उत्तर कोरियाविरुद्ध रणनीती आखण्यासाठी व्हाइट हाऊसकडून करण्यात आलेल्या अंतर्गत चर्चेत थेट आक्रमण किंवा सत्तापलट असे दोन पर्याय सुचवण्यात आले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरिया ही अमेरिकेसमोरील सर्वात गंभीर बाहेरील आव्हान असल्याचे सांगितले होते. उत्तर कोरियाने अमेरिकेवर क्षेपणास्त्र हल्ला करण्याची धमकी दिल्यावर ट्रम्प यांनी असे कधीच होऊ शकत नाही असे सांगितले होते.
दहशतवादाला शरण देणाऱ्या देशात समावेश केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा उत्तर कोरियाने अमेरिकेला दिला होता. तसेच अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये झालेल्या युद्ध अभ्यासाबाबतही उत्तर कोरियाने संतप्त प्रतिक्रिया दिली होती.