अमेरिकेच्या परराष्ट्रखात्याने शिथिल केले भारतातील प्रवासासाठीचे निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 10:29 AM2021-07-21T10:29:08+5:302021-07-21T10:32:18+5:30

कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे अमेरिकन नागरिकांना आता भारतात प्रवास  करण्याबाबत असलेले निर्बंध अमेरिकेच्या परराष्ट्रखात्याने कमी केले आहे.

america relaxes travel restrictions in India | अमेरिकेच्या परराष्ट्रखात्याने शिथिल केले भारतातील प्रवासासाठीचे निर्बंध

अमेरिकेच्या परराष्ट्रखात्याने शिथिल केले भारतातील प्रवासासाठीचे निर्बंध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे अमेरिकन नागरिकांना आता भारतात प्रवास  करण्याबाबत असलेले निर्बंध अमेरिकेच्या परराष्ट्रखात्याने कमी केले आहे.  अमेरिकेने निर्बंध शिथिल करतानाच भारताला लेव्हल-४ वरून लेव्हल-३ वर आणले आहे. लेव्हल-३ चा अर्थ ‘प्रवासाचा फेरविचार करा’ असा होतो.

अमेरिकेच्या विदेश विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या ‘साथ नियंत्रण व प्रतिबंध केंद्रा’ने (सीडीसी) भारतातील प्रवासासाठी लेव्हल-३ ची सूचना जारी केली आहे. याचा अर्थ देशात कोविड-१९ चा प्रादुर्भाव अजून मोठ्या प्रमाणात आहे, असा होतो. 

निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोणताही विदेशी प्रवास करण्यापूर्वी एफडीएने मान्यता दिलेली कोविड-१९ प्रतिबंधक लस घ्या. लसीमुळे संसर्गाचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे सीडीसीच्या शिफारशी अवश्य जाणून घ्या. अमेरिकेने पाकिस्तानातील प्रवासासाठीची सूचनाही लेव्हल-४ वरून लेव्हल-३ वर आणली आहे.

कॅनडा, यूएईने वाढविली विमानांवरील बंदी

भारतीय विमानांना असलेल्या प्रवेशबंदीमध्ये कॅनडाने २१ ऑगस्ट २०२१ पर्यंत वाढ केली आहे. त्याचप्रमाणे संयुक्त अरब अमिराती (यूएई) ने ही भारतीय विमानांवरील बंदीमध्ये वाढ केली आहे. याआधी कॅनडा सरकारने भारताची विमाने २१ जुलैपर्यंत निलंबित केली होती. भारतीय प्रवासी अप्रत्यक्ष मार्गाने मात्र कॅनडात प्रवेश करू शकतात. भारतातील कोरोना टेस्ट अहवाल स्वीकारण्याचे कॅनडाने नाकारले आहे. त्यामुळे भारतातून कॅनडात येणाऱ्या प्रवाशांना तिसऱ्या देशात कोरोना टेस्ट करून घ्यावी लागेल.
 

Web Title: america relaxes travel restrictions in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.