अमेरिका - सीमा वर्मा यांनी भगवदगीतेवर हात ठेवून घेतली शपथ
By admin | Published: March 15, 2017 11:24 AM2017-03-15T11:24:14+5:302017-03-15T11:44:08+5:30
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकन प्रशासनातील सेंटर्स फोर मेडिकेयर अँण्ड मेडिकएडच्या प्रमुखपदाची धुरा भारतीय वंशाच्या सीमा वर्मा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 15 - डोनाल्ड ट्रम्प सरकारमधील आरोग्याशी संबंधित एक महत्वाचं पद सांभाळण्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय वंशाच्या सीमा वर्मा यांना उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी शपथ दिली. सीमी वर्मा यांनी यावेळी भगवदगीतेवर हात टाकून शपथ घेतली. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकन प्रशासनातील सेंटर्स फोर मेडिकेयर अँण्ड मेडिकएडच्या प्रमुखपदाची धुरा भारतीय वंशाच्या सीमा वर्मा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
शपथविधीसाठी सीमा वर्मा यांचे पती संजय, मुलगी माया आणि मुलगा सीन यांच्यासोबत आई आणि बहिण उपस्थित होते. शपथ देत असताना पेंस यांनी 'अमेरिकेला जगातील सर्वात उत्तम आरोग्य व्यवस्था बनवण्यात तुम्ही मदत कराल', असं म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोग्य विमा कारभार सांभाळण्यासाठी सीमा वर्मा यांची निवड केली होती. त्यांच्या या निवडीला सोमवारी अमेरिकी सिनेटर्सकडून मंजूरी देण्यात आली. त्यांच्या निवडीवरून सिनेटर्समध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिनेटर्सनी विरोध केला होता. अखेर या लढतीत ५५-४३ अशा फरकाने त्यांचा विजय झाला.
उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्या समर्थक असलेल्या सीमा वर्मा यांची सेंटर फॉर मेडिकेयर आणि मेडिकेएड सेवेच्या प्रमुख असतील. तब्बल १ लाख कोटींचे बजेट असलेल्या सेंटर्स फोर मेडिकेयर अँण्ड मेडिकएडकडून अमेरिकेतील तब्बल १३ कोटी नागरिकांसाठी विमा योजना राबवली जाते. अमेरिकेतील आबालवृद्धांच्यादृष्टीने सेंटर फॉर मेडिकेयर आणि मेडिकेड सेवेची धोरणे अत्यंत महत्त्वाची असतात. या पार्श्वभूमीवर भारतीय वंशाच्यादृष्टीने या पदावर निवड होणे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
.@POTUS has made reforming our nation's healthcare system a top priority. In Seema Verma, he's made an exceptional choice to lead @CMSGov. pic.twitter.com/6OYbX1qD6g
— Vice President Pence (@VP) March 14, 2017