अमेरिका हबकली! चीनने दक्षिण समुद्रात दोन 'किलर' मिसाईल डागली; युद्धनौका उद्ध्वस्त करण्याची शक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 03:54 PM2020-08-27T15:54:29+5:302020-08-27T16:00:20+5:30

चीनने वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रात मिसाईल डागून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. चीनचे वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. चीनने 'कॅरियर किलर' नावाने दोन प्रसिद्ध मिसाईल दक्षिण चीन समुद्रात डागली आहेत.

America shocked! China launches two aircraft carrier 'killer' missiles in South China Sea | अमेरिका हबकली! चीनने दक्षिण समुद्रात दोन 'किलर' मिसाईल डागली; युद्धनौका उद्ध्वस्त करण्याची शक्ती

अमेरिका हबकली! चीनने दक्षिण समुद्रात दोन 'किलर' मिसाईल डागली; युद्धनौका उद्ध्वस्त करण्याची शक्ती

Next

चीन आणि अमेरिकेदरम्यानचा वाद काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अमेरिकेच्या दोन टेहळणी विमानांनी चीनच्या हद्दीत घुसून सैन्य तळावरच्या हालचाली टिपल्या होत्या. यावर चीनने आक्षेप नोंदविला होता. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. तर काही आठवड्यांपूर्वी अमरिकेच्या लढाऊ विमानांनी शांघायपासून 75 किमी अंतरावर फेरफटका मारला होता. आता चीनने या कृत्याला जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. 


 चीनने वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रात मिसाईल डागून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. चीनचे वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. चीनने 'कॅरियर किलर' नावाने दोन प्रसिद्ध मिसाईल दक्षिण चीन समुद्रात डागली आहेत. ही मिसाईल डागण्यामागे अमेरिकेला घाबरविणे आणि इशारा देणे आहे. 
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार बुधवारी DF-26B आणि DF-21D  ही दोन घातक मिसाईल हैनान आणि पारसेल बेटादरम्यान डागण्यात आली. ही मिसाईल मध्यम पल्ल्याची जरी असली तरी ती अचूक निशाना लावण्यात तरबेज आहेत. ही बॅलेस्टिक मिसाईल डागल्यामुळे या भागातील हवाई वाहतूक काही काळासाठी थांबविण्यात आली होती. 


काही दिवसांपूर्वी अमेरिकेची युद्धनौका रोनाल्ड रीगनने पारसेल बेटाजवळ युद्धाभ्यास केला होता. त्यालाच उत्तर देण्यासाठी चीनने ही मिसाईल डागल्याचे मानले जात आहे. अमेरिकेच्या U2 या टेहळणी विमानांच्या घुसखेरीमुळेही चीन नाराज आहे. 
DF-21D मिसाईलला कॅरिअर किलर म्हटले जाते. जर हे मिसाईल कोणत्याही युद्धनौकेवर डागल्यास ती युद्धनौका पूर्णपणे उद्ध्वस्त होते. DF-26B या मिसाईलला क्विंघाई प्रांतातून डागण्यात आले होते. तर DF-21D मिसाईल शांघायच्या दक्षिणेकडील झेजियांग प्रांतातून डागण्यात आले होते. 
चीनच्या संरक्षण मंत्रालयाने यावर एक वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. ही कारवाई एक सरावाचा भाग होती. प्रवक्ते वू कीन यांनी सांगितले की, अमेरिकेच्या टेहळणी विमानांनी चीनला उकसवले आहे. यामुळे ही मिसाईल डागण्यात आली आहेत. अमेरिकेने असे प्रकार थांबवावेत. जर अमेरिका असेच युद्धाभ्यास आणि लढाऊ विमानांची उड्डाणे सुरु ठेवणार अ,सेल तर चीनही त्याचा प्रत्यूत्तर देईल. 


 

पहिली गोळी झाडणार नाही...
दक्षिण चीन समुद्रात सुरु असलेल्या युद्धाभ्यासावेळी अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढू लागला होता. यावर चीनने आपल्या सैनिकांना नरमाईचे आदेश दिले असून अमेरिकी सैन्य़ावर कोणत्याही परिस्थितीत पहिली गोळी चालवू नका, असे निर्देश दिले आहेत. अमेरिकेचे आरोग्य मंत्री चार दशकांनंतर तैवानच्या दौऱ्यावर असताना चीनचे हे आदेश आले आहेत. दक्षिण समुद्रातील वादग्रस्त भागात सध्या चीन आणि अमेरिका दोन्ही देश सैन्याची ताकद वाढवू लागले आहेत. या साऊथ चायना सीवर चीनची कम्युनिस्ट पार्टी दावा सांगत आली आहे. 
या वादग्रस्त क्षेत्रात आता अमेरिका सारखा दबाव वाढवत असून अशात दोन्ही अण्वस्त्र संपन्न देशांमध्ये युद्ध होण्याचे संकेत आहेत. यामुळे चीन वाढता तणाव कमी करू इच्छित आहे. कारण सध्या अमेरिकेत निवडणुकीचे वारे असून कट्टरवादी गट या तणावाचा फायदा घेण्याची भीती चीनला वाटू लागली आहे. असे झाल्यास दोन्ही देशांमधील संबंध भविष्यात बिघडण्याची शक्यता आहे. यामुळे चीनने त्यांच्या लढाऊ विमानांच्या पाय़लटांना आणि नौसेनेला अमेरिकेच्या युद्धनौका आणि लढाऊ विमानांच्या दळणवळणाला प्रतिकार न करण्यासाठी संयम बाळगण्याचे आदेश दिले आहेत. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

TikTok चे सीईओ केविन मेयर यांचा राजीनामा; अमेरिकेचा मोठा दबाव

सुशांत राजपूत: "तीन महिन्यांपासून सुरु होते Black Magic"; रियाच्या घरी गोंधळ उडाला

Video: जग पुन्हा हादरले! रशियाने सर्वात शक्तीशाली, संहारक अणुबॉम्ब जगासमोर आणला

रेल्वेमध्ये भरती, मुलाखत...; 50 जणांकडून उकळले 1 कोटी

लडाखमध्ये परिस्थिती खूपच गंभीर; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची कबुली

बडे काम की चीज! LIC ने आणली नवी पॉलिसी; आयुष्यभर देणार उत्पन्न

Web Title: America shocked! China launches two aircraft carrier 'killer' missiles in South China Sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.