अमेरिका पुन्हा हादरली! फिलाडेल्फियामधील बारबाहेर 12 जणांवर झाडल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 10:25 AM2022-11-06T10:25:47+5:302022-11-06T10:27:11+5:30
फिलाडेल्फिया येथील केन्सिंग्टन परिसरात एका बारबाहेर झालेल्या गोळीबारात 12 जण जखमी झाले आहेत.
अमेरिका पुन्हा एकदा गोळीबाराने हादरली आहे. फिलाडेल्फिया येथील केन्सिंग्टन परिसरात एका बारबाहेर झालेल्या गोळीबारात 12 जण जखमी झाले आहेत. ईस्ट एलेघेनी आणि केन्सिंग्टन एव्हेन्यू परिसरात शनिवारी रात्री गोळीबार झाला. गोळीबाराच्या घटनेत किमान 12 जणांना गोळ्या लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जखमींच्या सद्यस्थितीबाबत माहिती मिळू शकली नाही.
गोळीबार नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या घटनेचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये फिलाडेल्फिया बारजवळ पोलीस वाहने उभी असलेली पाहायला मिळत आहेत. जॅक बारबाहेर झालेल्या गोळीबारानंतर अनेक पोलीस कर्मचारी फिलाडेल्फियाच्या केन्सिंग्टन येथे दाखल झाले आहेत.
फिलाडेल्फिया पोलीस विभागाचे इन्स्पेक्टर डी.एफ. पेस यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांना केन्सिंग्टन आणि एलेघेनी एव्हेन्यूजजवळ गोळ्या घालण्यात आल्या. त्याच्या मेडिकल कंडिशनबद्दल त्वरित कोणतीही माहिती मिळाली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 11 वाजण्याच्या आधी हा गोळीबार झाला. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत कोणालाही अटक केलेली नाही. अमेरिकेतील शहरांमध्ये गोळीबाराच्या घटना वारंवार घडत आहेत आणि त्यात अनेक निष्पापांचा जीव गेले आहेत.
बंदुकांवर लायसन्स नसल्यामुळे गन कल्चर अमेरिकेत खूप लोकप्रिय आहे. याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. अनेक वेळा सरकारने बंदुकांवर परवाने लागू करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येकाला बंदूक बाळगण्याच्या स्वातंत्र्याच्या समर्थकांपुढे त्यांचं काहीच चाललं नाही. सप्टेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात, टेनेसी राज्यातील मेम्फिस शहरात फेसबुक लाईव्ह स्ट्रीम करत असताना एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"