बांगलादेशातील स्थितीवर अमेरिकेने हस्तक्षेप करावा; भारतीय अमेरिकींच्या संघटनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 08:36 IST2024-11-29T08:35:49+5:302024-11-29T08:36:18+5:30

या दडपशाहीला आणि यामुळे होत असलेल्या विस्थापनाला आवर घालावी, फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडिज संघटनेची मागणी

America should intervene on the situation in Bangladesh; A demand for organization of Indian Americans | बांगलादेशातील स्थितीवर अमेरिकेने हस्तक्षेप करावा; भारतीय अमेरिकींच्या संघटनेची मागणी

बांगलादेशातील स्थितीवर अमेरिकेने हस्तक्षेप करावा; भारतीय अमेरिकींच्या संघटनेची मागणी

नवी दिल्ली - भारतीय-अमेरिकींच्या सदस्यांची संघटना असलेल्या एका संघटनेने बांगला देशात अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हस्तक्षेप करावा आणि याची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. भारताच्या शेजारी देशाचे आता कट्टरवादी देशात रूपांतर होत असल्याची शंकाही या संघटनेने उपस्थित केली आहे.

बांगला देशात चिन्मय कृष्णदास यांना झालेली अटक आणि अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर बायडेन आणि ट्रम्प यांनी दखल घेऊन हस्तक्षेप करावा, अशी मागणी ‘एफआयआयडीस’ (फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडिज) या संघटनेचे अध्यक्ष खंडेराव कंद यांनी पत्र लिहून केली आहे. कंद यांनी म्हटले आहे की, या दडपशाहीला आणि यामुळे होत असलेल्या विस्थापनाला आवर घालावी.

इस्काॅनवर निर्बंधास काेर्टाचा नकार
बांगला देशात इस्काॅनवर निर्बंध लागू करण्यास येथील उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. न्यायालयाने स्वत:हून दखल घेत ही कारवाई करावी, अशी मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली होती. तत्पूर्वी सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य ती पावले उचलली असल्याचे प्रशासनामार्फत न्यायालयास कळवण्यात आले होते.

घटना चिंताजनक : थरूर
बांगला देशातील स्थिती पाहता परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी ११ डिसेंबर रोजी या देशातील परिस्थितीविषयी संसदेच्या स्थायी समितीला अहवाल सादर करतील, असे समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी म्हटले आहे. बांगला देशातील घटना चिंताजनक असल्याचे थरूर यांनी नमूद केले.

कोलकात्यात निदर्शने
हिंदू जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी कोलकात्यात बांगला देशाच्या उप-उच्चायुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. तेथील आध्यात्मिक नेते चिन्मय कृष्णदास यांच्या अटकेलाही विरोध केला. 

Web Title: America should intervene on the situation in Bangladesh; A demand for organization of Indian Americans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.