अमेरिकेने भारताला शस्त्रास्त्र विकू नये - चीन
By admin | Published: January 30, 2017 11:12 AM2017-01-30T11:12:33+5:302017-01-30T11:12:33+5:30
अमेरिकेत नव्याने सत्तेवर आलेल्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाबरोबर चर्चा करताना चीनसाठी सहा विषय अत्यंत महत्वाचे आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 30 - अमेरिकेत नव्याने सत्तेवर आलेल्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाबरोबर चर्चा करताना चीनसाठी सहा विषय अत्यंत महत्वाचे आहेत. यामध्ये अमेरिकेकडून भारताला होणारी शस्त्रास्त्र विक्री आणि भारत-चीन सीमावाद हे दोन महत्वाचे मुद्दे असणार आहेत.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार मायकल पील्सब्युरी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला ही माहिती दिली. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिका-चीन संबंध अधिक बिघडतील आणि ते भारताच्या हिताचे राहिल असा आंतरराष्ट्रीय विषयांच्या तज्ञांचे मत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी चीनने ज्या विषयांची यादी तयारी केली आहे त्यामध्ये भारताशी संबंधित दोन विषय असल्याची माहिती पील्सब्युरी यांनी दिली. भारताने आतापर्यंत अमेरिका किंवा अन्य कुठल्या देशाकडून केलेल्या शस्त्रास्त्र खरेदीवर चीनने कधीही जाहीर आक्षेप घेतला नव्हता. पण आता चीनकडून होणारी आडकाठी महत्वाची बाब आहे.