मानवाधिकारांच्या उल्लंघनावरून अमेरिकाच अडकली

By admin | Published: December 12, 2014 02:35 AM2014-12-12T02:35:20+5:302014-12-12T02:35:20+5:30

कार्यक्रमाचा अहवाल प्रसिद्ध झाल्यावर अमेरिकेला आपल्या मानवाधिकारांशी संबंधित भूमिकेचे समर्थन करणो अवघड झाले आहे.

America is stuck on human rights violations | मानवाधिकारांच्या उल्लंघनावरून अमेरिकाच अडकली

मानवाधिकारांच्या उल्लंघनावरून अमेरिकाच अडकली

Next
वॉशिंग्टन : सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीकडून (सीआयए) होणारी अटक आणि चौकशी यावर आधारित कार्यक्रमाचा अहवाल प्रसिद्ध झाल्यावर अमेरिकेला आपल्या मानवाधिकारांशी संबंधित भूमिकेचे समर्थन करणो अवघड झाले आहे.
अमेरिकेच्या काही सहकारी देशांसह अन्य देशही या अहवालानंतर अमेरिकेच्या मानवाधिकारासंबंधी भूमिकेबद्दल प्रश्न विचारत आहेत. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांसह अन्य काही अधिका:यांनी चुका झाल्याचे व चौकशी करण्याच्या काही पद्धती वेदनादायी असल्याचे मान्य केले. चौकशी करण्याची अमेरिकन पद्धत आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचे अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी म्हटले तर चीन व इराणने मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याबद्दल अमेरिकेवर टीका केली आहे. या परिस्थितीत अमेरिकेने मानवाधिकाराच्या भूमिकेवर कायम असल्याचे जोर देऊन सांगितले. (वृत्तसंस्था)
 

 

Web Title: America is stuck on human rights violations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.