व्हाईट हाऊस सोडण्यापूर्वी चीनविरोधात मोठी अॅक्शन घेण्याच्या तयारीत ट्रम्प, बायडन यांच्या समस्या वाढविणार
By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 9, 2020 01:52 PM2020-11-09T13:52:31+5:302020-11-09T13:55:30+5:30
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी कोरोना व्हायरस महामारीवरून चिनच जबाबदार असल्याचे अनेक वेळा म्हटले आहे. बिजिंगच्या चुकीमुळेच अमेरिकेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचे ट्रम्प यांचे स्पष्ट मत आहे.
वॉशिंग्टन - डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन (Joe Biden) यांना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असले, तरी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) अद्याप व्हाईट हाऊस सोडायला तयार नाहीत. एका वृत्तानुसार, ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये अखेरचा महिना घालवणार आहेत. कारण ज्यो बायडन हे 20 जानेवारीला शपथर घेतील आणि यानंतर ट्रम्प यांना व्हाईट हाऊस सोडवावेच लागेल. अशात ट्रम्प चीनविरोधात (China) एक मोठी अॅक्शन घेण्याच्या तयारीत आहेत. ट्रम्प काहीसे असे करणार असल्याचे समजते, ज्यामुळे बायडन यांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी कोरोना व्हायरस महामारीवरून चिनच जबाबदार असल्याचे अनेक वेळा म्हटले आहे. बिजिंगच्या चुकीमुळेच अमेरिकेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचे ट्रम्प यांचे स्पष्ट मत आहे. जॉर्जटाऊन यूनिव्हर्सिटीचे सीनिअर फेलो जेम्स ग्रीन यांच्यामते, 20 जानेवारीला अमेरिकेला नवा राष्ट्राध्यक्ष मिळताच अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात मोठा बदल बघायला मिळू शकतो. अद्याप असे दिसत नाही, की ट्रम्प हे सहजपणे सर्व काही बायडन यांना सोपवतील. बायडन हे ईरान आणि चीनसंदर्भात मवाळ भूमिकेचा अवलंब करू शकतात, असेही ट्रम्प यांना वाटते. याचबरोबर सौदीचे क्राऊन प्रिंस बिन सलमान, तुर्कीचे राष्ट्रपती रेचेप तैयप एर्दोगन आणि नॉर्थ कोरियाचे तानाशाह किम जोंग उन यांच्या विरोधातही निर्णय घेतले जाऊ शकतात.
ट्रम्प घेऊ शकतात मोठा निर्णय -
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना महामारी आणि शिनजियांग प्रांतात उइगर मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराचे कारण सांगत ट्रम्प ट्रम्प सत्तेच्या आपल्या अखेरच्या महिन्यात, असा काही निर्णय घेऊ शकतात, की ज्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यात युद्धजन्न परिस्थिती निर्माण होईल. यात चिनी कम्यूनिस्ट पक्षाशी संबंधित लोकांवर व्हिसा बंदी आणि अमेरिकन अॅथलीट्सना बिजिंग ओलंम्पिक 2022मध्ये खेळण्यावर बंदीदेखील घालण्यात येऊ शकते. याशिवाय चिनी शस्त्रास्त्र निर्माण करणाऱ्या कंपन्यांनाही लक्ष्य केले जाऊ शकते. तसेच त्यांच्या खरेदी आणि विक्रीवरही निर्बंध घातले जाऊ शकतात. तज्ज्ञांच्यामते ट्रम्प यांनी अशा प्रकारचा काही निर्णय घेतल्यास बायडन यांना सत्ता सांभाळताच चीनचा सामना करावा लागेल. तसेच त्यांची भूमिका मवाळ झाल्यास अमेरिकन जनतेत बायडन यांच्यासंदर्भात चुकीचा संदेश जाईल.
या शिवाय, काही तज्ज्ञांच्यामते, बायडन आणि ट्रम्प यांच्या चीनबरोबरच्या परराष्ट्र धोरणात फारसा विशेष फरक नाही. निवडणुकीदरम्यान ट्रम्प यांनी चीनबद्दलची आपली भूमिका वेळोवेळी मांडली. त्याचा त्यांना फायदाही झाला. मात्र, बायडनदेखील आपल्या सभांमधून चीनविरोधात कठोर शब्दांचा वापर करत होते. चीनमध्ये उइगर मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर अमेरिका यूनायटेड नेशन्सवर चीनविरोधात कारवाई करण्यासाठी सातत्याने दबाव टाकत आहे. यामुळे ट्रम्प याच बहाण्याने चीनविरोधात कारवाई करू शकतात.