कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प...? सर्व्हेतून जाणून घ्या, इंडियन-अमेरिकन्सची पहिली पसंत कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 04:12 PM2024-10-29T16:12:10+5:302024-10-29T16:14:08+5:30

ताज्या सर्वेक्षणानुसार, 10 पैकी 6 भारतीय-अमेरिकन्स कमला हॅरिस यांना सपोर्ट करताना दिसत आहेत...

America us president elections 2024 Kamala Harris or Donald Trump know from the survey, who is the first choice of Indian-Americans | कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प...? सर्व्हेतून जाणून घ्या, इंडियन-अमेरिकन्सची पहिली पसंत कोण?

कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प...? सर्व्हेतून जाणून घ्या, इंडियन-अमेरिकन्सची पहिली पसंत कोण?

US President Chunav 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प दोघेही विजयासाठी कंबर कसून प्रयत्न करत आहेत. सध्या कमला हॅरीस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची लढाई  बघायला मिळत आहे. कधी कमला हॅरिस विजयी होताना दिसत आहेत तर कधी डोनाल्ड ट्रम्प विजयी होताना दिसत आहेत. मात्र, भारतीय-अमेरिकनांची पहिली पसंती कोण? हा सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे. अमेरिकेत 5 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे.

ताज्या सर्वेक्षणानुसार, 10 पैकी 6 भारतीय-अमेरिकन्स कमला हॅरिस यांना सपोर्ट करताना दिसत आहेत. सर्वेक्षणानुसार, भारतीय-अमेरिकन्स 2024 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचेही समर्थन करत आहेत, मात्र, पूर्वीच्या तुलनेत हा कल कमी झाल्याचे दिसते. सर्वेक्षणानुसार, रजिस्टर्ड भारतीय-अमेरिकन्स व्होटर्स पैकी 61% लोक डेमोक्रॅट कमला हॅरिस यांना मतदान करण्याचा विचार करत आहेत. तर 32% लोक रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करू इच्छित आहेत.

इंडिअन अमेरिकन अॅटिट्यूड सर्व्हेमध्ये (IAAS) किमात 47% लोकांनी स्वतःला डेमोक्रॅट म्हटले आहे. 2020 च्या सर्व्हेच्या तुलनेत हा आकडा कमी आहे. तेव्हा हा आकडा 56% एवढा होता. तसेच, स्वतःला रिपब्लिकन म्हणवणाऱ्यांची संख्या 21% वर स्थिर असून इंडिपेंडेंट सांगणाऱ्यांची संख्या वाढून 26% वर पोहोचल्याचेही सर्व्हेत सांगण्यात आले आहे. तसेच, महिलांच्या तुलनेत अधिक भारतीय-अमेरिकन पुरुषच कमला हॅरिस यांचे समर्थन करत असल्याचेही या सर्व्हेतून समोर आले आहे.

Web Title: America us president elections 2024 Kamala Harris or Donald Trump know from the survey, who is the first choice of Indian-Americans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.