जपाननंतर चीनवर अणुबॉम्ब टाकणार होता अमेरिका, गुप्त अहवालातून उघड झालं १९५८ सालचं रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 05:05 PM2021-05-23T17:05:37+5:302021-05-23T17:09:57+5:30

अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध केल्या काही वर्षांमध्ये चांगलेच ताणले गेले आहेत. त्यात आता कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर अमेरिकेनं चीनविरोधात मोर्चाच उघडला आहे.

america was about to launch nuclear attack on china in 1958 according to a secret document | जपाननंतर चीनवर अणुबॉम्ब टाकणार होता अमेरिका, गुप्त अहवालातून उघड झालं १९५८ सालचं रहस्य!

जपाननंतर चीनवर अणुबॉम्ब टाकणार होता अमेरिका, गुप्त अहवालातून उघड झालं १९५८ सालचं रहस्य!

Next

अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध केल्या काही वर्षांमध्ये चांगलेच ताणले गेले आहेत. त्यात आता कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर अमेरिकेनं चीनविरोधात मोर्चाच उघडला आहे. पण आता एक गुप्त अहवाल उघडकीस आला आहे. ज्यात अमेरिकेचा १९५८ सालीच चीनवर अणुबॉम्ब हल्ला करण्याचा मनसुबा होता. पण तो निर्णय मागे घेण्यात आला होता आणि या हल्ल्यामागचं कारण होतं तैवान. (america was about to launch nuclear attack on china in 1958 according to a secret document)

तैवानला चीनच्या कम्युनिस्ट शासनापासून वाचविण्यासाठी अमेरिका चीनवर अणुबॉम्ब हल्ला करण्याच्या तयारीत होता. अर्थात असं काही पाऊल उचललं गेलं तर रशिया चीनच्या मदतीला धावून जाईल याची कल्पना अमेरिकेला होती. पण तैवानला वाचविण्यासाठी अमेरिकेची कोणत्याही पद्धतीची मदत करण्याची तयारी होती. 

अमेरिकेचे माजी सैन्य विशेषज्ज्ञ डॅनिअल एल्सबर्ग (९०) यांनी यासंदर्भातील खुलासा केला आहे. अमेरिकेच्या चीनवरील हल्ल्याच्या मनसुब्यांबाबतचे काही खास कागदपत्र त्यांनी ऑनलाइन पोस्ट केले आहेत. या कागदपत्रांमध्ये अमेरिका चीनला लक्ष्य करणार असल्याचा स्पष्ट उल्लेख केलेला दिसतो. "चीननं जर अशाच प्रकारे तैवानवर हल्ला करणं सुरू ठेवलं तर चीनला मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागेल", असा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये करण्यात आला होता. 

चीनच्या विमानतळांवर निशाणा
न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत डॅनियल सांगतात की, 1970 च्या सुरुवातीला या गुप्त कागदपत्रांच्या कॉपी करण्यात आल्या होत्या. ही कागदपत्रं तैवान कॉन्फिक्ल्ट डॉक्युमेंटचा भाग होती. सध्याच्या घडीला पुन्हा एकदा चीन आणि अमेरिका एकमेकांसोर उभे ठाकले आहेत. त्यामुळेच ही कागदपत्र जाहीर केल्याचं डॅनियल यांनी सांगितलं. 

डॅनियल यांचं नाव याआधी १९७१ साली व्हिएतनाम युद्धाबाबतच्या पँटागॉन पेपर्स लीक प्रकरणातही समोर आलं होतं. सध्या उघड करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये चीनला रोखण्यासाठी अमेरिकेनं चीनच्या विमानतळांवर अणुहल्ला करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं नमूद करण्यात आलं होतं. जर युद्ध झालंच तर याशिवाय दुसरा कोणताच पर्याय अमेरिकेसमोर नाही, अशीही नोंद त्यावेळी करण्यात आली होती. 

Web Title: america was about to launch nuclear attack on china in 1958 according to a secret document

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.