'जो बायडेन यांना मारायचंय...', भारतीय वंशाच्या तरुणाने White House वर ट्रक चढवला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 02:35 PM2023-05-24T14:35:01+5:302023-05-24T14:36:10+5:30

व्हाईट हाउसवर ट्रक घेऊन गेल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. जाणून घ्या प्रकरण...

America white house indian-origin-19-year-old-teen-arrested-in-us-crashes-truck-on-white-house-barriers | 'जो बायडेन यांना मारायचंय...', भारतीय वंशाच्या तरुणाने White House वर ट्रक चढवला

'जो बायडेन यांना मारायचंय...', भारतीय वंशाच्या तरुणाने White House वर ट्रक चढवला

googlenewsNext

America White House: अमेरिकेत एका 19 वर्षीय भारतीय वंशाच्या मुलाला राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाउसवर ट्रक चढवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुलाने व्हाईट हाऊसजवळील बॅरिकेडींवर ट्रक चढवला. आरोपीचे नाव साई वर्षित कंदुला आहे. त्याने काही आक्षेपार्ह विधानंही केली आहेत, ज्यावरुन त्याचा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना इजा करण्याचा त्यांचा हेतू होता, असे दिसते.

पीटीआयने मीडिया रिपोर्ट्सच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलाने सांगितले की त्याला बायडन यांना मारायचे आहे. तो भाड्याच्या ट्रकने व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने ट्रक लाफायेट पार्कच्या उत्तरेकडील सुरक्षा बॅरिकेडींगवर चढवला. ही घटना सकाळी दहाच्या सूमारास घडली.

व्हाईट हाऊसच्या गेटजवळ ही घटना घडली. यामुळे जवळचे हॉटेल रिकामे करावे लागले. ट्रक धडकला तेव्हा लोक इकडे तिकडे धावू लागले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आरोपी साई कंदुला अमेरिकेतील मिसुरी राज्यातील चेस्टरफिल्ड येथील रहिवासी आहे. सोमवारी रात्री त्याने ट्रक भाड्याने घेतला होता. 

पकडल्यानंतर आरोपी काय म्हणाला?
अटकेनंतर आरोपीने अधिकाऱ्यांना सांगितले की, तो गेल्या सहा महिन्यांपासून हल्ल्याचा कट रचत होता. व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश करणे, सत्ता काबीज करणे आणि देशाचा कारभार हाती घेणे, असा त्याचा हेतू होता. अधिकार्‍यांनी विचारले की, तुला सत्ते कशी मिळेल, त्यावर तो म्हणाला, मी राष्ट्राध्यक्षाला मारेन आणि माझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला इजा पोहचवेन. तपास यंत्रणा एफबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मानसिक आरोग्याच्या अँगलने तपास होणार आहे.

Web Title: America white house indian-origin-19-year-old-teen-arrested-in-us-crashes-truck-on-white-house-barriers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.