दिलासादायक: अमेरिका जगभरात सप्लाय करणार एस्ट्राजेनेकाचे 6 कोटी डोस, अद्याप एफडीएची मंजुरी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 07:35 PM2021-04-28T19:35:20+5:302021-04-28T19:35:55+5:30

वॉशिग्टन : देश आणि जगात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रोजच्या रोज लाखोच्या संख्येने कोरोना रुग्ण आढळत आहेत. ...

America will worldwide supply 6 crore doses of astrazeneca fda has not yet approved | दिलासादायक: अमेरिका जगभरात सप्लाय करणार एस्ट्राजेनेकाचे 6 कोटी डोस, अद्याप एफडीएची मंजुरी नाही

दिलासादायक: अमेरिका जगभरात सप्लाय करणार एस्ट्राजेनेकाचे 6 कोटी डोस, अद्याप एफडीएची मंजुरी नाही

googlenewsNext

वॉशिग्टन : देश आणि जगात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रोजच्या रोज लाखोच्या संख्येने कोरोना रुग्ण आढळत आहेत. यातच, अमेरिकेतून दिलासादायक वृत्त आले आहे. अमेरिकेने जगभरातील देशांना विश्वास दिला आहे, की त्यांना लवकरच कोरोनाविरोधातील एस्ट्राजेनेकाचे 6 कोटी डोस मिळतील. ( America will worldwide supply 6 crore doses of astrazeneca fda has not yet approved)

अमेरिकेने म्हटले आहे, की त्यांनी या कोरोनालशीचे 6 कोटी डोस जगभरात सप्लाय करण्याची योजना तयार केली आहे. मात्र, अद्याप अमेरिकेच्या खाद्य तथा औषधी प्रशासनाने (एफडीए) एस्ट्राजेनेकाची मंजुरी दिलेली नाही. मात्र, असे असतानाही, जगभरातील अनेक देशांत या लशीचा वापर केला जात आहे.

CoronaVirus: कोरोनाचे 617 व्हेरिएंट्स आपलं काहीच बिघडवू शकणार नाही; तज्ज्ञ सांगतात, ...म्हणून लशीसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक

अमेरिकन सर्जन जनरल डॉ. विवेक मूर्ती यांनी सोमवारी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली, की अमेरिका जगातील इतर देशांसोबत कोरोना लस एस्ट्राजेनेका सामाईक करण्याची घोषणा करतो. 6 कोटी डोस उपलब्ध झाल्यानंतर ते जगासाठी सामाईक केले जातील. कोविड प्रबंधांसंदर्भात व्हाइट हाऊसचे वरिष्ठ सल्लागार अँडी स्लेविट यांनीही, असेच ट्विट केले आहे.

मार्च महिन्यात कॅनडा आणि मॅक्सिकोला दिले 4 कोटी डोस - 
गेल्या महिन्यातच व्हाइट हाऊसने कोरोनाचे जवळपास चार कोटी डोस कॅनडा आणि मॅक्सिकोला सप्लाय केले होते. व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव जेन साकी यांनी स्पष्ट केले आहे, की पुढील काही आठवड्यांत एस्ट्राजेनेकाच्या या लशी उपलब्ध होतील. सध्या आमच्याकडे एस्ट्राजेनेका लशीचे डोस उपलब्ध नाहीत.

परिस्थिती हाता बाहेर, हात जोडून सांगत आहोत, लॉकडाउन लावा...; योगी सरकारला HC नं फटकारलं

एफडीएच्या समीक्षेवर प्रश्नचिन्ह -
साकी म्हणाल्या, एफडीएला सुरक्षितता निश्चित करण्यासाठी समीक्षेची आवश्कता का पडली? यावर आम्ही विचार करत आहोत. एफडीएची मंजुरी मिळाल्यानंतर आम्हाला साधारणपणे एक कोटी डोस तयार होण्याची आशा आहे. पुढील काही आठवड्यात, असे होऊ शकते, आता नाही. याशिवाय, 5 कोटी डोस उत्पादनाच्या विविध टप्प्यांवर आहेत. मे आणि जूनपर्यंत याचे सर्व टप्पे पूर्ण करण्यात येतील, अशी आशा आहे.

Web Title: America will worldwide supply 6 crore doses of astrazeneca fda has not yet approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.