अमेरिकेनं भारताला परत केल्या २४८ प्राचीन वस्तू; १२ व्या शतकातील नटराजाच्या मूर्तीचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 09:24 AM2021-10-29T09:24:23+5:302021-10-29T09:24:50+5:30

Authorities Return 248 Antiquities to India : या वस्तूंमध्ये १९६० मध्ये भारतातील एका मंदिरातून चोरी झालेल्या १२ व्या शतकातील कांस्य नटराज मूर्तीचाही समावेश आहे.

American Authorities Return 248 Looted Antiquities to India | अमेरिकेनं भारताला परत केल्या २४८ प्राचीन वस्तू; १२ व्या शतकातील नटराजाच्या मूर्तीचाही समावेश

अमेरिकेनं भारताला परत केल्या २४८ प्राचीन वस्तू; १२ व्या शतकातील नटराजाच्या मूर्तीचाही समावेश

Next

अमेरिकेनं गुरुवारी भारताला अनेक प्राचीन वस्तू परतकेल्या. या सर्व अशा वस्तू आहेत ज्यांची अनेक वर्षांपूर्वी चोरी करण्यात आली होती. आता अमेरिकेनं त्या वस्तू भारताला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एकूण २४८ वस्तूंचा समावेश आहे आणि त्यांची किंमत जवळपास दीड कोटी डॉलर्स असल्याचं म्हटलं जात आहे. 

या वस्तूंमध्ये १२ व्या शतकातल्या कांस्य नटराज मूर्तीचाही समावेश आहे. भारतातील एक मंदिरातून १९६० मध्ये ही मूर्ती चोरण्यात आली होती. त्यानंतर एका आरोपीनं ती न्यूयॉर्कमध्ये विकली होती. पपरंतु आता अमेरिकन एजन्सींनी या किंमती वस्तू जप्त केल्या आहेत आणि त्या भारताला परत करण्याचं कामही केलं आहे. नटराजाच्या मूर्तीशिवाय कांस्य नंदिकेश्वर आणि कांस्य कंकलमूर्तीदेखील चोरी करण्यात आली होती. हे सर्व आता भारताला परत करण्यात आलं आहे. 

या सर्व प्रक्रियेबाबत मॅनहॅटनचे डिस्ट्रिक्ट अॅटर्नी सी वान्स यांनी प्रतिक्रिया दिली. "गेल्या एका दशकात पाच निरनिराळ्या गुन्हेगारी तपासादरम्यान अनेक किंमती वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. या भारतातील प्राचीन कलाकृती असल्याचं सांगण्यात आलं आहे," असं ते म्हणाले. या वस्तू भारताला परत केल्यानंतर भारतानंही अमेरिकेचे आभार मानले आहेत. यापुढेही भारत आणि अमेरिकेचे संबंध असेच पाहायचे आहेत ज्यामुळे दोन्ही देशांमद्ये सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत होतील, अशी प्रतिक्रिया भारताचे काऊन्सल जनरल रणधीर जयस्वाल यांनी दिली.

चोरी करून विकल्या जात होत्या वस्तू
यापूर्वीही अमेरिकेनं भारताला प्राचीन वस्तू परत केल्या होत्या. परंतु मोठ्या प्रमाणात वस्तू परत करण्याचं काम पहिल्यांदा होत आहे. ज्या २४८वस्तू परत केल्या गेल्या आहेत, त्यापैकी २३५ वस्तू आर्ट डीलर सुभाष कपूरकडून मिळाल्या आहेत. सध्या तो तुरूगांत बंद आहे. याशिवाय त्याच्या अन्य एका साथीदारालाही अटक करण्यात आली आहे. त्यानं भारताशिवाय, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, थायलंड सारख्या देशातून सामान चोरलं होतं.

Web Title: American Authorities Return 248 Looted Antiquities to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.