अमेरिकन लेखक पॉल बेट्टी यांना ‘मॅन बुकर’ पुरस्कार
By admin | Published: October 26, 2016 04:23 AM2016-10-26T04:23:57+5:302016-10-26T06:26:11+5:30
अमेरिकेचे लेखक पॉल बेट्टी यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘मॅन बुकर’ पुरस्कार देण्यात आला. साहित्यातील पुरस्काराच्या इतिहासात प्रथमच अमेरिकन लेखकाला हा पुरस्कार मिळाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि, 26 - अमेरिकेचे लेखक पॉल बेट्टी यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘मॅन बुकर’ पुरस्कार देण्यात आला. साहित्यातील पुरस्काराच्या इतिहासात प्रथमच अमेरिकन लेखकाला हा पुरस्कार मिळाला आहे. पॉल बेट्टी यांच्या प्रसिद्ध 'द सेलआऊट' या कादंबरीला हा पुस्कार मिळाला.
चार तास चाललेल्या बैठकीनंतर परिक्षकांनी एकमताने ‘मॅन बुकर’ पुरस्कारासाठी लेखक पॉल बेट्टी यांच्या 'द सेलआऊट' या कादंबरीची निवड केली. या पुरस्कारासाठी 50 हजार पौंड बक्षिस स्वरुपात देण्यात येणार असल्याची माहिती परिक्षक अमांडा फोरेमन यांनी दिली.
अमेरिकेतील कृष्णवर्णीय- आफ्रो अमेरिकी वंशाच्या एकेकाळच्या गुलामांची बहुसंख्या असलेले एक शहरच पुसले जाणे, ते पुन्हा वसवताना श्वेतवर्णीयांना खालची वागणूक देण्याचा आटोकाट प्रयत्न होणे, असे अचाट कथानक 'द सेलआऊट' या कादंबरीत पाहावयास मिळते.