हॉस्पिटलच्या चुकीमुळे कपलची उडाली झोप, दुसऱ्याच्या मुलाची आई बनली महिला आणि आता...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 12:34 PM2021-11-11T12:34:27+5:302021-11-11T12:37:47+5:30
IVF एक अशी प्रक्रिया आहे ज्याअंतर्गत महिलेचे १० ते १५ अंडी बनवली जातात आणि मग ते बाहेर काढून पुरूषांच्या स्पर्मसोबत फर्टिलाइज केले जातात.
अमेरिकेतील एका IVF क्लीनिकच्या मोठ्या चुकीमुळे एका कपलचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे. आता पीडित कपल न्यायासाठी कोर्टाचा दारात गेलं आहे. क्लीनिक स्टाफ चुकून IVF ची अदलाबदली केली. ज्यामुळे महिलेने दुसऱ्याच्या बाळाला जन्म दिला. हे तेव्हा समजलं जेव्हा बाळ आपल्या आई-वडिलांपेक्षा पूर्णपणे वेगळं दिसत होतं.
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात राहणारे डॅफना आणि अलेक्झांडर कार्डिनेलने बाळासाठी IVF चा मार्ग स्वीकारला होता. यानंतर डॅफनाने सप्टेंबर २०१९ मध्ये एका अशा मुलीला जन्म दिली, जी त्यांच्यासारखी दिसत नव्हती. तेव्हा कपलला संशय आला की, क्लीनिककडून काहीतरी गडबड झाली आहे.
यानंतर कपलने DNA टेस्ट केली. तेव्हा सत्य समोर आलं. त्यानंतर डॅफना आणि अलेक्झांडर कार्डिनेलने त्या दाम्पत्याचाही शोध घेतला ज्यांच्यासोबत IVF ची अदला-बदली झाली होती. तशी IVF बदल्याची ही काही पहिली घटना नाही. अशाप्रकारच्या घटना याआधीही समोर आल्या आहेत. IVF एक अशी प्रक्रिया आहे ज्याअंतर्गत महिलेचे १० ते १५ अंडी बनवली जातात आणि मग ते बाहेर काढून पुरूषांच्या स्पर्मसोबत फर्टिलाइज केले जातात. त्यानंतर एका योग्यवेळी ते महिलेच्या यूटरसमध्ये ट्रान्सफर केले जातात.
पीडित कपलने आता क्लीनिकवर बेजबाबदारपणा आणि फसणुकीचा आरोप लावत त्यांना कोर्टात खेचलं आहे. कपल म्हणालं की, या घटनेची सत्य समोर आल्यापासून ते भावनात्मक रूपाने आतून खचले आहेत. त्यांचं हे दु:खं कोणत्याही स्थितीत कमी समजलं जाऊ नये. डॅफना म्हणाली की, 'आमचं बाळ दुसऱ्या कुणाला देण्यात आलं आणि ज्या बाळासाठी आम्ही प्रार्थना केली ते आमचं नव्हतं. ही फारच वेदनादायी जाणीव आहे'.
कपलने २०१८ च्या उन्हाळ्यात फर्टिलिटी क्लीनिकला संपर्क केला होता आणि २०१९ मध्ये महिलेने एका बाळाला जन्म दिला. कोर्टात पीडित परिवाराच्या वकिलाने सांगितलं की, बाळाच्या जन्मानंतर जेव्हा डॅफनाने तिला पाहिलं तर तिला आश्चर्याचा धक्का बसला. कारण बाळाचा रंग वेगळा होता. तेव्हा कपलने डीएनए करण्याचा विचार केला तेव्हा जे समोर आलं त्याने त्यांना धक्का बसला.