अमेरिका : बाजी पलटण्याच्या तयारीत ट्रम्प; पेंटागॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची केली उचलबांगडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 09:53 AM2020-11-12T09:53:53+5:302020-11-12T09:57:44+5:30
माईक पॉम्पियो यांच्या या वक्तव्यानंतर, ट्रम्प आकस्मिकरित्या बाजी पलटण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी चर्चा अमेरिकन माध्यमांमध्येसुरू झाली आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अद्यापही राषट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारण्यास तयार नाहीत. यातच आता माध्यमांमध्येही बाजी पलटण्यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संरक्षणमंत्री माईक पॉम्पियो यांनी म्हटले आहे, की अगदी शांततामयरित्या सत्तेचे हस्तांतर होईल. मात्र, डोनाल्ड ट्रम्प हेच राष्ट्राध्यक्ष होतील. नव्या सरकारची तयारी सुरू आहे.
ट्रम्प प्रशासनने केले काही मोठे बदल -
माईक पॉम्पियो यांच्या या वक्तव्यानंतर, ट्रम्प आकस्मिकरित्या बाजी पलटण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी चर्चा अमेरिकन माध्यमांमध्येसुरू झाली आहे. एवढेच नाही, तर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून अमेरिकन संरक्षण मंत्रालयातही मोठ्या प्रमाणावर बदल केले जात असल्याचे वृत्त आहे. पेंटागॉनमध्ये वेगाने होत असलेल्या सिव्हिल नेतृत्वातातील बदलांमुळे लोकांची चिंता वाढवली आहे. ट्रम्प प्रशासनाने पेंटागॉनमधील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याची उचलबांगडी केली आहे.
संरक्षण सचिव मार्क अॅस्पर यांना पदावरून काढले -
ट्रम्प प्रशासनाने यापूर्वी संरक्षण सचिव मार्क अॅस्पर यांना पदावरून काढले होते. ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, "मार्क अॅस्पर यांना बरखास्त करण्यात आले आहे. "त्यांनी म्हटले आहे, की ते अॅस्पर यांच्या जागी राष्ट्रीय संरक्षण दहशतवाद केंद्रचे संचालक ख्रिस्तोफर सी. मिलर यांना कार्यवाहक संरक्षण सचिव म्हणून नियुक्त करत आहेत. अॅस्पर यांची बरखास्ती ज्यो बाइडन च्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शपथेपर्यंत अराजक निर्माण करेल.
निवडणुकीच्या केवळ एक आठवडा आधीच अॅस्पर यांनी भारताचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी माइक पॉम्पिओ यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासह 2 प्लस 2 मंत्रिस्तरावरील चर्चेत भाग घेतला होता. सीनेटमधील परराष्ट्र संबंधातील समितीचे डेमोक्रॅट क्रिस मर्फी यांनी इशारा देत म्हटले आहे, की "या संक्रमण काळात ट्रम्प राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात एक धोकादायक अस्थिर वातावरण निर्माण करत आहेत."