US Fighter Jet Crash: चीनच्या समुद्रात अमेरिकेचे लढाऊ विमान कोसळले; पायलट वाचला, ७ जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 10:13 AM2022-01-25T10:13:18+5:302022-01-25T10:13:54+5:30

American Fighter Jet Crash: दक्षिण चीन समुद्रात चीनसोबतच्या तणावामुळे अमेरिकेने आपली दोन विमानवाहू युद्धनौका तैनात केलेल्या आहेत. चीन आपल्या संपूर्ण भूभागावर दावा करत आहे.

American Fighter Jet Crash Lands In South China Sea As Pilot Ejects, 7 Injured | US Fighter Jet Crash: चीनच्या समुद्रात अमेरिकेचे लढाऊ विमान कोसळले; पायलट वाचला, ७ जवान जखमी

US Fighter Jet Crash: चीनच्या समुद्रात अमेरिकेचे लढाऊ विमान कोसळले; पायलट वाचला, ७ जवान जखमी

googlenewsNext

एकीकडे रशियन समुद्रात, युरोप सीमेवर कोणत्याही क्षणी जागतिक युद्धाला तोड फुटण्याची शक्यता असताना चीनच्या समुद्रात मोठी घटना घडली आहे. अमेरिकेचे अद्ययावत लढाऊ विमान एफ-३५ कोसळले आहे.  यामध्ये पायलट वाचला असला तरी सात जवान जखमी झाले आहेत. 

अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेवर हा अपघात झाला आहे. लढाऊ विमान धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाला, पायलटने वेळेवर बाहेर पडण्याचे बटन दाबल्याने तो वाचला आहे. अमेरिकन नौदलानुसार हेलिकॉप्टरद्वारे त्याला तातडीने समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. हा अपघात रविवारी झाला. 

नौदलाने म्हटले की, एफ-35 सी लाइटनिंग-2 हे लढाऊ विमान युद्धनौका युएसएस कार्ल विंसनवर उतरत असताना हा अपघात झाला आहे. हे लढाऊ विमान दक्षिण चीन समुद्रात रोजच्या उड्डाणासाठी गेले होते. विमान उतरत असताना नौदलाचे सात जवान तिथे उपस्थित होते. ते जखमी झाले आहेत. यापैकी तीन जवानांना फिलिपिन्सची राजधानी मनिला येथील मेडिकल ट्रिटमेंट फॅसिलिटी सेंटरमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर उर्वरित चार जवानांवर युद्धनौकेवरच उपचार करण्यात येत आहेत. 

दक्षिण चीन समुद्रात चीनसोबतच्या तणावामुळे अमेरिकेने आपली दोन विमानवाहू युद्धनौका तैनात केलेल्या आहेत. चीन आपल्या संपूर्ण भूभागावर दावा करत आहे. त्याच वेळी, या प्रदेशातील इतर देश देखील त्यांचा दावा करतात. दक्षिण चीन समुद्रावरून चीन आणि अमेरिका अनेकदा आमनेसामने आले आहेत. तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीनमध्ये प्रचंड तणाव आहे.

Web Title: American Fighter Jet Crash Lands In South China Sea As Pilot Ejects, 7 Injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.