अमेरिकेतील कॉलेजमध्ये माथेफिरुचा गोळीबार, १२ ठार

By admin | Published: October 2, 2015 11:48 AM2015-10-02T11:48:01+5:302015-10-02T11:54:56+5:30

अमेरिकेतील रोजबर्ग येथील उम्पका महाविद्यालयात एका माथेफिरु तरुणाने अंधाधूंद गोळीबार केल्याने १० विद्यार्थ्यांचा जणांचा मृत्यू झाले आहे.

American fishermen shot dead, 12 killed | अमेरिकेतील कॉलेजमध्ये माथेफिरुचा गोळीबार, १२ ठार

अमेरिकेतील कॉलेजमध्ये माथेफिरुचा गोळीबार, १२ ठार

Next

ऑनलाइन लोकमत

रोजबर्ग, दि. २ - अमेरिकेतील रोजबर्ग येथील उम्पका महाविद्यालयात एका माथेफिरु तरुणाने अंधाधूंद गोळीबार केल्याने १० विद्यार्थ्यांचा जणांचा मृत्यू झाले आहे. या हल्ल्यात २० जण जखमी झाले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पोलिसांच्या कारवाईत हल्लोखाराची मृत्यू झाला आहे.

अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार सकाळी साडे दहाच्या सुमारास एका माथेफिरु तरुणाने शस्त्रास्त्रांसह उम्पका महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश केला. यानंतर त्याने महाविद्यालयातील हॉलमध्ये जाऊन अंधाधूंद गोळीबार केला. यात १० जणांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाले. हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महाविद्यालयाला गराडा घातला. पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे. हल्लेखोराकडे तीन हँड ग्रेनेड व एक बंदुक आढळली आहे. हल्लेखोराचे नाव ख्रिस हार्पर (वय २६ वर्ष ) असे असून हल्ल्यामागचे कारण मात्र समजू शकलेले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या घटनेचा निषेध दर्शवत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. अमेरिकेत प्रत्येक व्यक्तीसाठी शस्त्रास्त्र उपलब्ध असून शस्त्रास्त्र कायद्यातील नियम आणखी कठोर करण्याची गरज असल्याचे ओबामा यांनी म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत गोळीबाराच्या घटना वाढल्या असून शस्त्रास्त्रांच्या नियमात बदल करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. 

Web Title: American fishermen shot dead, 12 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.