"यंदा मला जिंकवा"! डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितलेली चीनकडे मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 07:47 AM2020-06-18T07:47:37+5:302020-06-18T08:47:11+5:30

माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी मोठा खुलासा केला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

American former NSA expose Donald Trump and China's relation in his book | "यंदा मला जिंकवा"! डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितलेली चीनकडे मदत

"यंदा मला जिंकवा"! डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितलेली चीनकडे मदत

googlenewsNext

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या पुस्तकाने छपाईआधीच जगभरात खळबळ उडवून दिली आहे. बोल्टन यांनी यामध्ये अमेरिका आणि चीनच्या संबंधांबाबत मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. ट्रम्प यांनी 2020 मधील निवडणुकांमध्ये जिंकण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची मदत मागितली होती, असा दावा त्यांनी केला आहे. 


बोल्टन यांच्या पुस्तकाचा काही भाग द वॉल स्ट्रीट जर्नल, द वॉशिंग्टन पोस्ट आणि द न्यू यॉर्क टाइम्समध्ये छापून आला आहे. यामध्ये केलेल्या दाव्यानुसार गेल्या वर्षी जूनमध्ये जपानच्या ओसोकामध्ये झालेल्या G-20 परिषदेवेळी ट्रम्प हे जिनपिंग यांना भेटले होते. यावेळी ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीबाबत बोलायला लागले. चीनची आर्थिक क्षमता अशी आहे की अमेरिकेतील निवडणुकांवर प्रभाव टाकू शकते. यामुळे मला जिंकविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ट्रम्प यांनी केली. 


एवढेच नाही तर ट्रम्प यांनी अमेरिकेतील शेतकऱ्यांच्या महत्वावर जोक दिला होता. चीनचे सोयाबिन आणि गहू खरेदी केल्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. निवडणूक जिंकविण्यासाठी ट्रम्प यांनी दोन मोठी आमिषेही चीनला दाखविली. यामध्ये अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेले ट्रेड वॉर संपविणे आणि चीनमधील उईगर मुस्लिमांसाठी कँम्प बनविण्याची तयारी ट्रम्प यांनी दर्शविली होती. 


दरम्यान, आता या संबंधांमध्ये कोरोनामुळे कटुता आली आहे. बुधवारी अमेरिकेने चीनमधील उईगर मुस्लिमांविरोधातील कारवाईवरून चीनला शिक्षा देण्यासाठी बिल पास केले आहे. यानुसार उईगर मुस्लिमांवर अन्याय करणारे आणि त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये टाकणाऱ्या अधिकाऱ्यांना अमेरिकेमध्ये बंदी आणण्यात येणार आहे. चीनच्या विरोधात असे पाऊल उचलणारा अमेरिका पहिलाच देश आहे.  हे बिल अशावेळी पास करण्यात आले जेव्हा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ हे चीनच्या राजनैतिक अधिकाऱ्याला भेटण्यासाठी गेले होते. 


ट्रम्प यांच्या उलट्या बोंबा
या पुस्तकातील दावा खरा असेल तर ट्रम्प विरोधी उमेदवार जो बाईडेन यांच्याविरोधात उलट्या बोंबा मारत होते. त्यांनी जो यांच्यावरच चीनशी संबंध असल्याचे आरोप केले आहेत. तसेच चीन बाईडेन यांना निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आरोप केले आहेत. कोरोना व्हायरसवरून चीनला धमक्या देणे साऊथ चायना सीवरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरु आहेत. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

India China Face Off: ओप्पोने घेतला 'बायकॉट'चा धसका; Find X2 चे लाईव्ह लाँचिंगच केले रद्द

India China Face Off: चीनच्या वर्मावरच बोट; केंद्र सरकार टेलिकॉम उपकरणांचे मोठे कंत्राट रद्द करणार

Sushant Singh Rajput Suicide: सलमान खान, करण जोहरसह ८ जणांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल

घरातच काढलेत! हे भन्नाट फोटो पहाल तर चक्कर येऊन पडाल

उंची लहान, पण आत्मविश्वास दांडगा होता; हे लेफ्टनंट ठरणार प्रेरणादायी

India China Face Off: भारतीय गुराख्याचे नाव गलवान घाटी, नदीला; बाप दिलदार दरोडेखोर होता

India China Face Off: भारतीय सैन्य घमेंडी; मोठ्या युद्धासाठी तयार; चीनची युद्धखोरीची भाषा

Read in English

Web Title: American former NSA expose Donald Trump and China's relation in his book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.