अमेरिकन नेत्याच्या मोठ्या स्कॅंडलचा खुलासा, इन्स्टाग्राम मॉडलने केलेला आरोप वाचून सगळेच हैराण....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 12:21 IST2021-05-17T11:51:09+5:302021-05-17T12:21:58+5:30
द डेली बीस्टच्या रिपोर्टनुसार, फ्लोरिडाचे गेट्ज यांच्यावर कमीत कमी १५ तरूणींना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पैसे दिल्याचा आऱोप आहे.

अमेरिकन नेत्याच्या मोठ्या स्कॅंडलचा खुलासा, इन्स्टाग्राम मॉडलने केलेला आरोप वाचून सगळेच हैराण....
अमेरिकेतील एका मोठ्या नेत्याच्या स्कॅंडलचा खुलासा झाला आहे. अमेरिकन कॉंग्रेस नेता मॅट गेट्जवर हा खळबळजनक आरोप लावण्यात आला आहे की, त्यांनी पैसे देऊन १५ तरूणींसोबत संबंध ठेवले. गेट्ज यांना ट्रम्प यांच्या सरकारमध्ये फार प्रभावशाली मानलं जात होतं.
द डेली बीस्टच्या रिपोर्टनुसार, फ्लोरिडाचे गेट्ज यांच्यावर कमीत कमी १५ तरूणींना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पैसे दिल्याचा आऱोप आहे. हा खळबळजनक आरोप करणाऱ्या महिला एस्कॉर्ट आणि इन्स्टाग्राम मॉ़डलचं नाव जालोन्का आहे. ती ऑक्टोबर २०१९ मध्ये ऑरलॅंडोमध्ये ट्रम्प सरकारमध्ये राहिलेल्या गेट्ज यांना भेटली होती.
दावा केला जात आहे की, घोटाळ्याचे आरोप झाल्यावर नेता मॅट गेट्ज यांनी ड्रग्स घेतलं आणि एका महिलेसोबत संबंध ठेवला. यासाठी महिलेला टॅक्सच्या पैशातून १५ हजार डॉलर दिले गेले. या महिलेला फ्लोरिडामध्ये सोशल मीडियाच्या कामासाठी नोकरी देण्यात आली होती.. पण तिने कधी सोशल मीडियाचं काही काम केलं नाही.
द डेली बीस्टच्या रिपोर्टनुसार, कार्यक्रमानंतर गेट्ज यांच्या हॉटेलमधील रूममध्ये एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, २८ वर्षीय जालोन्का आणि गेट्जने ड्रग्सचं सेवन केलं होतं. सूत्रांनी वेबसाइटला सांगितलं की, जालोन्का आणि फ्लोरिडाचे नेते गेट्ज यांच्या शरीरसंबंधाच्या बदल्यात पैशांना देवाण-घेवाण सुरू होती.
रिपोर्टनुसार, २०१७ मध्ये जालोन्काचा ग्रीनबर्गच्या संबंधाना मॅट गेट्जसाठी मुलींना तयार करण्यासाठी वापर केला गेला. ग्रीनबर्ग गेट्जचा मित्र आहे. जोएल ग्रीनबर्ग फसवणूक आणि लैंगिक शोषणाच्या सहा केसेस प्रकरणात दोषी ठरवण्यासाठी सोमवारी कोर्टात हजर होईल. कोर्टात गेट्जवर ट्रम्प फंडरायजरमध्ये कोकेन पार्टीनंतर एस्कॉर्ट मेगन जालोन्काला पैसे दिल्याचा आरोपही लावला जईल.