इसिसविरोधी लढाईत अमेरिकी मुस्लिम भागीदार
By admin | Published: March 26, 2016 11:48 PM2016-03-26T23:48:06+5:302016-03-26T23:48:06+5:30
इस्लामिक स्टेटविरुद्धच्या लढाईत अमेरिकी मुस्लिम महत्त्वाचे भागीदार असल्याचे सांगून राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी रिपब्लिकनची उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प आणि
वॉशिंग्टन : इस्लामिक स्टेटविरुद्धच्या लढाईत अमेरिकी मुस्लिम महत्त्वाचे भागीदार असल्याचे सांगून राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी रिपब्लिकनची उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प आणि टेड क्रूझ यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला चढविला. मुस्लिम समुदायाला बदमान करण्याचे प्रयत्न उधळून लावायला हवेत, असे आवाहनही ओबामांनी केले.
ओबामा आपल्या साप्ताहिक वेब आणि रेडिओ भाषणात म्हणाले की, ‘इसिसच्या द्वेषयुक्त आणि हिंसक दुष्प्रचाराविरुद्धची लढाई जिंकण्याचा आमचा पण आहे. ही संघटना इस्लामच्या विचारांना विकृत रूपात सादर करते.
तरुण मुस्लिमांना कट्टरवादी बनविणे हे या संघटनेचे लक्ष्य आहे, असे ओबामा म्हणाले. ट्रम्प व क्रूझ यांनी अलीकडेच केलेल्या मुस्लिमविरोधी विधानांचा अप्रत्यक्ष उल्लेख करीत ओबामा म्हणाले की, इसिसच्या उच्चाटनात अमेरिकी मुस्लिम आमचे प्रमुख भागीदार आहेत. त्यामुळे अमेरिकी मुस्लिम आणि आमच्या देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाला बदमान करण्याच्या प्रयत्नांना आमचा विरोध आहे. (वृत्तसंस्था)