कवयित्री लुईसे ग्लूक यांना साहित्यासाठीचा नोबेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 01:18 AM2020-10-09T01:18:12+5:302020-10-09T01:18:26+5:30

२०१६ मध्ये अमेरिकेचे बॉब डायलॅन यांना नोबेल जाहीर झाल्यानंतर ग्लूक या हा सन्मान मिळवणाऱ्या पहिल्याच अमेरिकन ठरल्या आहेत.

American Poet Louise Gluck Awarded 2020 Nobel Prize In Literature | कवयित्री लुईसे ग्लूक यांना साहित्यासाठीचा नोबेल

कवयित्री लुईसे ग्लूक यांना साहित्यासाठीचा नोबेल

googlenewsNext

स्टॉकहोम : अमेरिकन कवयित्री लुईसे ग्लूक यांना (७७) साहित्यासाठी ‘कँडीड अँड अनकॉम्प्रमायझिंग’साठी नोबेल पारितोषिक गुरुवारी जाहीर झाले. २०१६ मध्ये अमेरिकेचे बॉब डायलॅन यांना नोबेल जाहीर झाल्यानंतर ग्लूक या हा सन्मान मिळवणाऱ्या पहिल्याच अमेरिकन ठरल्या आहेत.

नोबेल समितीने ग्लूक यांच्या ‘काव्य लेखनाने प्रत्येकाचे अस्तित्व हे वैश्विक बनण्यास सुंदर मदत केली आहे’, अशा शब्दांत त्यांचा गौरव केला आहे. स्विडीश अकॅडमीचे स्थायी सचिव मॅट्स माम यांनी येथे या पुरस्काराची घोषणा केली. ग्लूक यांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला असून त्या येल युनिव्हर्सिटीत इंग्रजीच्या प्रोफेसर आहेत. त्यांनी १९६८ मध्ये ‘फर्स्टबॉर्न’ लिहून आपला लेखन प्रवास सुरू केला आणि लवकरच त्या अमेरिकेत समकालीन वाङ्मयात प्रमुख कवयित्री म्हणून प्रसिद्ध झाल्या.

Web Title: American Poet Louise Gluck Awarded 2020 Nobel Prize In Literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.