आयसिसचा म्होरक्या बगदादी ठार?; ट्रम्प यांच्या ट्विटनं चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 10:18 AM2019-10-27T10:18:52+5:302019-10-27T10:20:06+5:30
थोड्याच वेळाच व्हाईट हाऊसकडून मोठी घोषणा होणार
नवी दिल्ली: अमेरिकेनं आयसिसचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीविरोधात अमेरिकेनं मोठी कारवाई सुरू केल्याचं वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सनं दिलं आहे. याच वेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काहीतरी मोठं घडलंय, असं ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे बगदादीचा खात्मा करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. थोड्याच वेळात डोनाल्ड ट्रम्प मोठी घोषणा करणार असल्याची माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या घोषणेकडे जगाचं लक्ष लागलं आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)
The United States has carried out an operation targeting Islamic State leader Abu Bakr al-Baghdadi: Reuters (file pic) pic.twitter.com/tH1KUmDXaG
— ANI (@ANI) October 27, 2019
अमेरिकेनं बगदादीविरोधात सुरू केलेली कारवाई आणि नेमक्या त्याच वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं ट्विट याची जगभरात चर्चा सुरू झाली आहे. एप्रिलमध्ये आयसिसनं बगदादीचा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. पाच वर्षात प्रथमच आयसिसनं बगदादीचा व्हिडीओ जारी केला होता. मात्र तो व्हिडीओ नेमका कधी चित्रित करण्यात आला, हे स्पष्ट होऊ शकलं नव्हतं. या व्हिडीओत त्यानं पूर्व सीरियातल्या आयसिसचा शेवटच्या बालेकिल्ला असलेल्या बागूजमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा उल्लेख केला होता.
Something very big has just happened!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 27, 2019
बागूजमध्ये सुरू असलेला संघर्ष महिन्याभरापूर्वी संपला आहे. व्हिडीओत बगदादी तीन व्यक्तींना संबोधित करत होता. मात्र त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. गेल्या काही दिवसांत श्रीलंकेत दहशतवादी हल्ले झाले. त्यात आयसिसचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हल्ल्यांमध्ये ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर ५०० नागरिक गंभीर जखमी झाले. श्रीलंकेतल्या विविध शहरांमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटांमध्ये चर्चना लक्ष्य करण्यात आलं होतं.