डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम...! अद्याप जिंकलेही नाही, पण भारतावर साधला निशाणा; चीनलाही सोडलं नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 07:19 PM2024-07-22T19:19:14+5:302024-07-22T19:20:19+5:30
मिशिगनमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना ट्रम्प यांनी केवळ चीनच नव्हे, तर भारतावरही निशाणा साधला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जगातील एक अत्यंत आक्रमक नेते म्हणून बघितले जाते. ते चीनसंदर्भात बोलतात, तर रशियासंदर्भातही बोलतात. त कधी म्हणतात, मी राष्ट्रपती असोत तर युक्रेन युद्ध झाले नसते. मात्र यावेळी तर त्यांनी थेट भारतावरच निशाणा साधला आहे. मिशिगनमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना ट्रम्प यांनी केवळ चीनच नव्हे, तर भारतावरही निशाणा साधला आहे.
चीनवर हल्ला चढवताना ट्रम्प म्हणाले, चीनला वाटते की, आपण येथे काहीतरी बनवावे आणि त्यांच्याकडे पाठवावे. म्हणजे त्यांना त्यावर 250% टॅरिफ लावता येईल. यानंतर, ऑफर करतील की, या आपला प्लांट लावा. मह या कंपन्या तेथे जातात. यानंतर ट्रम्प यांनी यांनी भारतावरही निशाणा साथला. भारतासंदर्भात बोलताना टम्प म्हणाले, हार्ले डेव्हिडसनसोबत भारतानेही हेच केले. हार्ले डेव्हिडसनवर भारताने 200 टक्के टेरिफ लावले. यानंतर त्यांना त्यांची दुचाकी तेथे विकता आली नाही.
'द्यावा लागतोय 200% टेरीफ' -
ट्रम्प यांनी अद्याप निवडणूकही जिंकलेली नाही, मात्र ते अगदी राष्ट्रपती असल्यासारखे बोलत आहेत. या रॅलीत ते म्हणाले, मला हार्ले डेव्हिडसनचे प्रमुख भेटले होते. त्यांचे बोलणे ऐकून मी अत्यंत निराश झालो. 2018 मध्ये त्याच्या कंपनीने भारतात 5 ते 50 लाख रुपयांपर्यंतच्या बाइक्स लाँच केल्या. तेव्हा मी त्यांना विचारले होते की, आपला भारतातील व्यवसाय कसा सुरू आहे? यावर ते म्हणाले, चांगला सुरू नाही. आम्हाला 200% टेरिफ द्यावा लागत आहे. पण ते आमच्यावर एवढा टेरिफ का लावतात? अखेर त्यांना प्लांट लावण्यासाठी भाग पाडले गेले, असे ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेतील या निवडणुकीत ट्रम्प यांनी जशीच्या तशी उचलली भाजपची घोषणा -
आता अमेरिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने भाजप अथवा पंतप्रधान मोदींची घोषणा जशीच्या तशी उचलली आहे. रिपब्लिकन पक्षाने 'अबकी बार 400 पार' चा नारा दिला आहे. हीच घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक-2024 मध्ये दिली होती. यावेळचे वातावरण पाहता, 400 इलेक्टोरल मतांचा आकडा ओलांडला जाऊ शकतो, असे डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांना वाटते.