US President Joe Biden: एकीकडे सुरू होतं COP-26 सम्मेलन, दुसरीकडे अमेरिकन राष्ट्रपती ज्यो बायडेन घेत होते डुलकी; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 12:14 AM2021-11-03T00:14:16+5:302021-11-03T00:14:40+5:30
खरे तर, COP-26 क्लायमेट चेंज सम्मेलनात एका प्रदीर्घ भाषणादरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती काहीसे थकलेले दिसून आले. यानंतर, ते डोळे बंद करताना दिसून आले. याचवेळी त्यांनी भाषणादरम्यान थोडीशी हलकी डुलकीही घेतली. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अमेरिकन राष्ट्रपती ज्यो बायडेन ग्लासगो येथे COP-26 क्लायमेट चेंज सम्मेलनात हलकी डुलकी घेताना दिसून आले आहेत. याचा व्हिडिओही सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यामुळे ज्यो बायडेन यांच्यावर थेट टीका होत आहे. यात सर्वात मोठे टीकाकार अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच आहेत. (Joe Biden Viral Video)
खरे तर, COP-26 क्लायमेट चेंज सम्मेलनात एका प्रदीर्घ भाषणादरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती काहीसे थकलेले दिसून आले. यानंतर, ते डोळे बंद करताना दिसून आले. याचवेळी त्यांनी भाषणादरम्यान थोडीशी हलकी डुलकीही घेतली. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, राष्ट्रपती जो बायडेन आपले डोळे बंद करताना दिसत आहेत. भाषण सुरू असताना त्याचे डोळे बंद होते. व्हिडिओमध्ये काही वेळानंतर बायडेन यांचा एक सहकारी त्यांच्या जवळ येताना दिसतो. यानंतर ते आपले डोळे उघडतात.
Biden appears to fall asleep during COP26 opening speeches pic.twitter.com/az8NZTWanI
— Zach Purser Brown (@zachjourno) November 1, 2021
...पण ते स्वतःच झोपले -
अमेरिकन राष्ट्रपती ज्यो बायडेन यांचा डुलकी घेतानाचा व्हिडिओ वाशिंग्टन पोस्टचे रिपोर्टर जॅक पर्सर ब्राऊन यांनी ट्विटर केला आहे. तसेच त्यांनी लिहिले आहे, की 'COP26 सुरुवातीच्या भाषणांदरम्यान झोपताना दिसले ज्यो बायडेन.' तसेच, माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही ज्यो बायडेन यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ते (बायडेन) या सम्मेलन ग्लोबल वॉर्मिंगच्या मुद्द्यावर आपला प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी गेला होते. पण ते स्वतःच झोपले.