...तर ही अमेरिकेसाठी शेवटची निवडणूक, डेमोक्रॅट्स करतायत मोठा 'खेला'; इलॉन मस्क यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 11:28 AM2024-09-30T11:28:13+5:302024-09-30T11:31:16+5:30
मस्क यानी म्हटले आहे की, अमेरिकेतील काही नागरिकांना वाटते की, जर ट्रम्प निवडून आले नाही तर ही शेवटची निवडणूक असेल. हा लोकशाहीसाटी धोका आहे आणि त्यापासून वाचायचा सर्वात मोठा उपाय म्हणजे ट्रम्प आहेत.
प्रसिद्द उद्योगपती इलॉन मस्क यांनी अमेरिकेच्या निवडणुकीसंदर्भात मोठा दावा केला आहे. जर यावेळी ट्रम्प राष्ट्रपती झाले नाही, तर अमेरिकेत पुन्हा निवडणुका होऊ शकणार नाहीत. ट्रम्प यांना निवडूनच देशातील लोकशाही आबाधित राखली जाऊ शकते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टला उत्तर देताना मस्क यांनी हे लिहिले आहे.
मस्क यानी म्हटले आहे की, अमेरिकेतील काही नागरिकांना वाटते की, जर ट्रम्प निवडून आले नाही तर ही शेवटची निवडणूक असेल. हा लोकशाहीसाटी धोका आहे आणि त्यापासून वाचायचा सर्वात मोठा उपाय म्हणजे ट्रम्प आहेत.
तत्पूर्वी, स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क यांनी आरोप केला होता की, निवडणुकीत अधिक मार्जीनने विजय मिळवता यावा यासाठी ज्यो बायडेन सरकार अवैध स्थलांतरितांना देशाचे नागरिकत्व देत आहे. जर दर वर्षी 20 पैकी एक जरी अवैध स्थलांतरित अमेरिकेचा नागरिक झाला तर चार वर्षात 20 लाख नवे मतदार तयार होतील. स्विंग स्टेट्समधील व्होटिंग मार्जिन 20 हजारपेक्षाही कमीचे आहे. अर्थात, जर डेमोक्रॅटिक पार्टीला यश मिळाले तर अधिक स्विंग स्टेट्स राहणारच नाही.
मस्क पुढे म्हणाले, बायडेन प्रशासन निर्वासितांना स्विंग स्टेट्समध्ये शरण देत आहे. त्यांना पेन्सिलव्हेनिया, ओहियो, विस्कोन्सिन आणि एरिझोनमध्ये आश्रय देत आहे. यामुळे आगामी काळात देशातील लोकशाही संपुष्टात येईल आणि एका पक्षाचा देश बनेल. एवढेच नाही तर 1986 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये असे झाले आहे. जेव्हा एखादा देश एका पक्षाद्वारे नियंत्रित होतो, तेव्हा बचावाचा कुठलाही मार्ग उरत नाही. अमेरिकेत सगळीकडे सॅन फ्रान्सिस्कोच्या भयावह स्वप्नासारखी स्थिती निर्माण होईल.