Lottery News : वृद्ध महिलेनं खरेदी केलं लॉटरीचं तिकीट अन् जिंकले 8 कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 09:44 AM2022-08-22T09:44:50+5:302022-08-22T09:58:42+5:30

Lottery News : ही महिला अमेरिकेतील मिशिगन राज्यातील लिनावी काउंटीची असून तिचे वय जवळपास 67 आहे.

american woman randomly buy lottery ticket from mobile gas station and wins 8 million dollar | Lottery News : वृद्ध महिलेनं खरेदी केलं लॉटरीचं तिकीट अन् जिंकले 8 कोटी!

Lottery News : वृद्ध महिलेनं खरेदी केलं लॉटरीचं तिकीट अन् जिंकले 8 कोटी!

googlenewsNext

अमेरिकेत (America) राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने येथील गॅस स्टेशनवरून (Gas Station) लॉटरीचे तिकीट (Lottery Ticket) विकत घेतले होते. त्यानंतर तिने या तिकिटाचे कूपन (Coupon) स्क्रॅच केले, तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, या महिलेने आपले नाव सांगितले नाही. ही महिला अमेरिकेतील मिशिगन राज्यातील लिनावी काउंटीची असून तिचे वय जवळपास 67 आहे.

वृद्ध महिलेने मिशिगन लॉटरी अधिकार्‍यांना सांगितले की, ती एड्रियनच्या मोबिल गॅस स्टेशनवर होती. त्यावेळी तिने रॅंडमली स्क्रॅच-ऑफ तिकीट खरेदी करण्याचा विचार केला आणि त्याचप्रमाणे तिकीट उचलले. यानंतर, महिलेने बार कोड स्क्रॅच केला, तेव्हा तिला समजले की, 10 लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास 8 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे.

वृद्ध महिलेने लॉटरी अधिकाऱ्यांना सांगितले की, तिने पहिल्यांदा बार कोड स्क्रॅच केला आणि नंतर बक्षीस जिंकले की नाही, हे पाहण्यासाठी तो स्कॅन केला आणि मशीनने क्लेम फाईल करण्यास सांगितले. त्यामुळे त्या महिलेने पुन्हा पुन्हा तिकीट स्कॅन केले, तिला वाटले की मशीन खराब नाही. पण जेव्हा तोच मेसेज पुन्हा पुन्हा आला, तेव्हा समजले की 40 मिलियनच्या कॅश पेआउट गेमच्या तिकिटावर तिला एक मिलियनची लॉटरी लागली होती. 

'जिंकलेली रक्कम बचत खात्यात ठेवणार'
महिलेने पुढे सांगितले की, जेव्हा जिंकलेल्या रकमेबद्दल समजले तेव्हा पहिल्यांदा विश्वास बसला नाही. महिला इतकी आनंदी झाली होती. पण, ती शांतपणे गाडीत बसून तिच्या घरी आली. कित्येक दिवस तिला झोपही आली नाही. लॉटरीत जिंकलेली रक्कम आता खर्च करणार नाही, बचत खात्यात (Saving Account) टाकणार असल्याचे तिने सांगितले. यासोबतच, तिने आपली ओळख उघड करू नये, अशी विनंती लॉटरी अधिकाऱ्यांना केली आहे.

Web Title: american woman randomly buy lottery ticket from mobile gas station and wins 8 million dollar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.