14 वर्षानंतर चीनमध्ये पोहचले अमेरिकाचे गोमांस, ट्रम्प म्हणाले...
By admin | Published: July 13, 2017 06:45 PM2017-07-13T18:45:02+5:302017-07-13T18:45:02+5:30
भारतात गोमांसावरुन राजकारण तापले असतानाच चीनमध्ये 14 वर्षानंतर अमेरिकाचे गोमांस पोहचले आहे
ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 13 - भारतात गोमांसावरुन राजकारण तापले असतानाच चीनमध्ये 14 वर्षानंतर अमेरिकाचे गोमांस पोहचले आहे. यावर ट्विटर करत अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आनंद झाल्याची भावना व्यक्त केली आहे. अमेरिकी आणि चीनमध्ये व्यापारावर नवा करार झाला आहे. त्या कराराअंतर्गत चीन मार्केटमध्ये अमेरिकेचं गोमांस दाखल झाले आहे. 14 वर्षापूर्वी चीनने अमेरिकेच्या गोमांवर बंदी केली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी आपाला आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणतात, अमेरिका आणि चीनमधील ह्या व्यपार करारामुळे कृषी क्षेत्राला चांगले दिवस येतील. गेल्या आठवड्यात अमेरिकेचे कृषीमंत्र्यांनी गोमांस निर्यातीचे औपचारिक उद्घाटन केले होते. या नव्या करारामुळे अमेरिकेला 2.5 अरब डॉलरचे गोमांस चीन मार्केटमध्ये दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.