अमेरिकेच्या सर्वात मोठ्या शत्रूने बनवला अणुबॉम्ब, अवघ्या १२ दिवसांत..., जग चिंतीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 01:59 PM2023-03-01T13:59:50+5:302023-03-01T14:00:27+5:30
Nuclear Bomb : इराणमधून अणुबॉम्बबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. इराण अणुबॉम्ब तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
इराणमधून अणुबॉम्बबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. इराण अणुबॉम्ब तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. इराण केवळ १२ दिवसांत अणुबॉम्बसाठी आवश्यक सामुग्री तयार करू शकतो. इराणने युरेनियमचा मोठा साठा गोळा केला आहे. इराणने हे युरेनियम एवढं संवर्धित केलं आहे की, ते अणुबॉम्ब विकसित करण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार डॉ. कॉलिन काहल यांनी सांगितले की, २०१५ मधील इराणला अणुकरारातील अटीनुसार आधी इराणला अणुबॉम्ब तयार करण्यासाठी आवश्यक सामुग्री तयार करण्यासाठी एक वर्ष लागत असे. त्यांनी सांगितले की, आम्ही व्यापक कारवाई योजना सोडल्यानंतर इराणची आण्विक प्रगती उल्लेखनीय आहे. जेव्हा मागच्या प्रशासनाने JCPOA सोडण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा इराणला अणुबॉम्ब तयार करण्यासाठी आवश्यक सामुग्री तयार करण्यासाठी बारा महिने लागत होते. आता १२ दिवस लागतील.
काहल यांनी सांगितले की, त्यामुळे मला वाटते की, जर या मुद्यावर समाधान काढायचे असेल, तर ते मूत्सद्देगिरीच्या माध्यमातून काढता येईल. इराणच्या आण्विक कार्यक्रमावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला तर तो इतर उपायांपेक्षा अधिक उत्तम ठरेल. मात्र सध्या JCPOA सुस्तावलेल्या स्थितीत आहे. तर अमेरिकी अधिकाऱ्यांच्या मते इराण विखंडनीय सामुग्रीचे उत्पादन करण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. मात्र इराणने अणुबॉम्ब विकसित करण्याचे तंत्र मिळवले आहे, यावर त्यांचा विश्वास नाही.