अमेरिकेची विविधता हा तिचा दुबळेपणा नाही - ओबामा
By admin | Published: September 11, 2016 09:40 PM2016-09-11T21:40:18+5:302016-09-11T21:40:18+5:30
वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांतील मृतांना रविवारी श्रद्धांजली अर्पण केली. मृतांचे नातेवाईक व आप्त ग्राऊंड झिरोवर एकत्र जमले होते.
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क/वॉशिंग्टन, दि. ११ : अमेरिकेने ११ सप्टेंबर २००१ (९/११) रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांतील मृतांना रविवारी श्रद्धांजली अर्पण केली. मृतांचे नातेवाईक व आप्त ग्राऊंड झिरोवर एकत्र जमले होते.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी या दहशतवादी हल्ल्यांतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करताना देशातील विविधता आत्मसात करण्याचे आणि दहशतवादी देशाची विभागणी करतील असे काही होऊ देऊ नका, असे आवाहन केले. अमेरिकेची विविधता हा तिचा दुबळेपणा नाही, असेही ते म्हणाले. ओबामा यांनी पेंटागॉन येथे मृतांना श्रद्धांजली वाहिली.
----------------
मोदींकडून श्रद्धांजली
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ९/११ दहशतवादी हल्ल्यांतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.
११ सप्टेंबर २००१ रोजी झालेला दहशतवादी हल्ला आणि ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी स्वामी विवेकानंद यांचे शिकागोत झालेले ऐतिहासिक भाषण या परस्परविरोधी प्रतिमा असल्याचे ते म्हणाले. विवेकानंदांनी त्या भाषणात जागतिक बंधुभाव आणि ऐक्याचे आवाहन केले होते. स्वामींनी त्या भाषणात अनेकांची मने जिंकली होती याची आठवण मोदी यांनी टिष्ट्वटरद्वारे करून दिली.