अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, हल्लेखोराचा मृत्यू

By admin | Published: June 14, 2017 06:46 PM2017-06-14T18:46:54+5:302017-06-14T23:49:43+5:30

अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ खासदारावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. कॉग्रेसचे ज्येष्ठ नेता स्टीव्ह स्कॅलीस यांच्यावर बंदुकधारी हल्लेखोराने गोळीबार केला आहे.

America's fierce firing, the death of the attacker | अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, हल्लेखोराचा मृत्यू

अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, हल्लेखोराचा मृत्यू

Next
>ऑनलाइन लोकमत
व्हर्जिनिया, दि. 14 - अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये काँग्रेसच्या एका ज्येष्ठ खासदारावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. कॉग्रेसचे ज्येष्ठ नेता स्टीव्ह स्कॅलीस यांच्यावर बंदुकधारी हल्लेखोराने गोळीबार केला आहे. या गोळीबारात स्टीव्ह स्कॅलीस यांच्यासह 5 जण गंभीर जखमी झाले. उपचारासाठी स्कॅलिस यांना जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर गोळीबार करणा-या एका हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.  
 
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यासह किमान 5 जण गंभीर जखमी झाले.  फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, वॉशिंग्टनजवळील उपनगरात अमेरिकी काँग्रेसमधील सदस्यांमध्ये बेसबॉलचा सामना होणार आहे. दरवर्षी अशा स्वरुपाचा सामन्याचे आयोजन केले जाते आणि या सामन्यासाठी बुधवारी सकाळी व्हर्जिनियामध्ये सराव सुरु होता. सरावासाठी अमेरिकी काँग्रेसमधील रिपब्लिकन सदस्य स्टीव्ह स्कॅलिस आणि अन्य मंडळी उपस्थित होती. अचानक एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात केली. ‘स्कॅलिस यांना नीट चालताही येत नव्हतं. घटनास्थळावरुन बाहेर पडतानाही त्यांना त्रास होत होता’ असं अमेरिकी काँग्रेसमधील मॉ ब्रुक्स यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितलं. 
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टीव्ह यांच्यासह त्यांचे तीन जवळचे सहकारीही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. हल्लेखोराने जवळपास 20 ते 23 राउंड फायर केले. हा दहशतवादी हल्ला आहे की नाही याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. 
 
  

Web Title: America's fierce firing, the death of the attacker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.