अमेरिका फर्स्ट हीच 'ट्रम्पनीती'

By admin | Published: January 20, 2017 11:05 PM2017-01-20T23:05:43+5:302017-01-20T23:13:40+5:30

सध्या अमेरिकेसमोर अनेक आव्हाने उभी आहेत, गरिबी, बेरोजगारी दूर करायची आहे.

America's First Hitch 'Trumpney' | अमेरिका फर्स्ट हीच 'ट्रम्पनीती'

अमेरिका फर्स्ट हीच 'ट्रम्पनीती'

Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 20 -  सध्या अमेरिकेसमोर अनेक आव्हाने उभी आहेत, गरिबी, बेरोजगारी दूर करायची आहे. भविष्याकडे लक्ष द्यायचे  आहे, हे करताना  सर्वप्रथम अमेरिका आणि अमेरिकन नागरिक यांचे हित पाहणे हेच आमचे धोरण असेल, अशा शब्दात अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या अध्यक्षीय भाषणात आपल्या कारकीर्दीचे धोरण स्पष्ट केले. 
अमेरिका आणि अमेरिकी नागरिक यांच्या हितालाच माझे प्राधान्य असेल, देशातील सर्व संसाधनांसह सर्व बाबींवर पहिला हक्क अमेरिकन नागरिकांचाच असेल, असे ट्रम्प यांनी सांगितले.  ही सत्ता माझी नाही नागरिकांची आहे. आपण सगळे मिळून देशाला बदलूया, असे आवाहन त्यांनी देशातील नागरिकांना केले. तसेच जगाला भेडसावत असलेल्या इस्लामिक दहशतवादाचा बिमोड करण्यास आपली प्राथमिकता राहील, असा कडक इशारा ट्रम्प यांनी दहशतवाद्यांना दिला. अमेरिकेला पुन्हा एकदा सर्वोत्तम, समृद्ध, शक्तिशाली आणि  महान बनवण्यासाठी आपले प्रयत्न असतील, असेही ट्रम्प यांनी सांगितले. 
 
ट्रम्प यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे 
 
-  आपण कोणीही असो, सगळ्यांनी पहिल्यांदा अमेरिकेच्या ध्वजाला सलाम केलं पाहिजे. 
- जगातील इस्लामिक दहशतवाद समूळ नष्ट करणार.
- अमेरिकेला पुन्हा एकदा शक्तिशाली, महान बनवण्यासाठी प्रयत्न करण्यास प्राधान्य असेल.
- अमेरिका एक महान देश आहे आणि आजच्या दिवशी पुन्हा एकदा देशात लोकांचे राज्य आले आहे. लोक शासक बनले आहेत.
- ही सत्ता माझी नाही नागरिकांची आहे. आपण सगळे मिळून देशाला बदलूया.
- डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिका फर्स्टचा नारा.
- आम्ही वॉशिंग्टनमधून अमेरिकी नागरिकांना त्यांची शक्ती परत करत आहोत.
-अमेरिका आणि अमेरिकी नागरिक यांच्या हितालाच माझे प्राधान्य असेल.
 
 

Web Title: America's First Hitch 'Trumpney'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.