अमेरिकेचे सर्वात मोठे रोव्हर मंगळाकडे झेपावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 04:50 AM2020-07-31T04:50:25+5:302020-07-31T04:50:34+5:30

‘पर्सेव्हरन्स’ (चिकाटी) या नावाचे हे रोव्हर या तांबड्या ग्रहावर लाखो वर्षांपूर्वी सूक्ष्मजीवसृष्टीच्या अस्तित्वाचे पुरावे मिळतात का याचा शोध घेईल व तसे काही नमुने मिळाल्यास ते संशोधनासाठी पृथ्वीवर घेऊन येईल.

America's largest rover flew to Mars | अमेरिकेचे सर्वात मोठे रोव्हर मंगळाकडे झेपावले

अमेरिकेचे सर्वात मोठे रोव्हर मंगळाकडे झेपावले

Next

वॉशिंटन : अमेरिकेच्या ‘नासा’ अंतराळ संशोधन संस्थेने त्यांचे आजवरचे सर्वात मोठे व चौथे रोव्हर मंगळ ग्रहाकडे रवाना केले.

‘पर्सेव्हरन्स’ (चिकाटी) या नावाचे हे रोव्हर या तांबड्या ग्रहावर लाखो वर्षांपूर्वी सूक्ष्मजीवसृष्टीच्या अस्तित्वाचे पुरावे मिळतात का याचा शोध घेईल व तसे काही नमुने मिळाल्यास ते संशोधनासाठी पृथ्वीवर घेऊन येईल. मंगळ व पृथ्वी परस्परांच्या सर्वाधिक जवळ येण्याचा काळ सध्या सुरु असून, त्याचा फायदा घेऊन गेल्या आठवडाभरात संयुक्त अरब अमिरात व चीन यांच्या पाठोपाठ मानवाने मंगळाकडे सोडलेले हे तिसरे यान आहे.


फ्लोरिडा राज्यातील केप कॅनेव्हेराल अंतराळ तळावरून ‘अ‍ॅटलास-५’ अग्निबाणाने ‘पर्सेव्हरन्स’ला कवेत घेऊन उड्डाण केले. हे रोव्हर साडेसहा महिन्यांनी मंगळाच्या कक्षेत पोहोचल्यानंतर मंगळाच्या पृष्ठभागावरील ‘झेझेरो’ नावाच्या विशाल विवरात १८ फेब्रुवारी रोजी उतरविण्याची योजना आहे.

 

Web Title: America's largest rover flew to Mars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :NASAनासा