अमेरिकेची मंगळ व चंद्रावर मानवी मोहीम, नवीन अंतराळ धोरणावर सही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:15 AM2017-12-13T01:15:25+5:302017-12-13T01:16:34+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या अंतराळ धोरणावर सही केली असून, यात नासाला चंद्र व मंगळावर मानवी मोहीम आखण्यासंबंधी निर्देश देण्यात आले आहेत. अमेरिका पुन्हा एकदा अंतराळविश्वात पृथ्वीचे नेतृत्व करील, याकडे लक्ष केंद्रित करण्याचे संकेत यातून मिळतात.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या अंतराळ धोरणावर सही केली असून, यात नासाला चंद्र व मंगळावर मानवी मोहीम आखण्यासंबंधी निर्देश देण्यात आले आहेत. अमेरिका पुन्हा एकदा अंतराळविश्वात पृथ्वीचे नेतृत्व करील, याकडे लक्ष केंद्रित करण्याचे संकेत यातून मिळतात.
१९७२ नंतर चंद्रावर स्वारी करण्यात आलेली नव्हती. अंतराळात मानव पाठविण्याच्या दिशेने हे उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे समजले जात आहे. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये सांगितले की, मी ज्यावर सही करीत आहे ते धोरण अमेरिकेच्या अंतराळ मोहिमेत मानवाद्वारे शोध व संशोधन करण्यावर भर देणारे आहे. १९७२ नंतर बºयाच कालावधीने चंद्रावर मानव पाठविण्याच्या व संशोधन करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल असेल. या आधी अपोलो मिशनअंतर्गत अमेरिकी अंतराळवीर चंद्रावर गेले होते.
ट्रम्प म्हणाले की, यावेळी आम्ही तेथे आपला झेंडा केवळ फडकवणारच नाही, तर आपला ठसाही उमटवणार आहोत. आम्ही मंगळासाठी मानवी मोहिमेचा पायाही ठेवणार आहोत. राष्टÑीय अंतराळ परिषदेचे प्रमुख अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प व उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी पुन्हा चंद्रावर मानवी मोहीम आखण्याचे यापूर्वी सुतोवाच केले होते. (वृत्तसंस्था)