महिन्याभराच्या आत अमेरिकेच्या NSA ने दिला पदाचा राजीनामा
By admin | Published: February 14, 2017 11:12 AM2017-02-14T11:12:16+5:302017-02-14T11:12:16+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सत्ता संभाळून अद्याप महिनाही झालेला नसताना त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल फ्लायन यांनी
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 14 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सत्ता संभाळून अद्याप महिनाही झालेला नसताना त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल फ्लायन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स आणि अन्य अधिका-यांना रशियन राजदूताबरोबर झालेल्या चर्चेची दिशाभूल करणारी माहिती दिल्यामुळे फ्लायन यांना राजीनामा द्यावा लागल्याची चर्चा आहे.
अमेरिकेतील रशियन राजदूताबरोबर फोनवरुन अनेकदा चर्चा केली पण उपराष्ट्राध्यक्षांना अपूर्ण माहिती दिली असे फ्लायन यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.
उपराष्ट्राध्यक्ष फ्लायन यांच्याकडून मिळणा-या माहितीवर अवलंबून होते. यावेळी रशियावर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधासंबंधीही चर्चा झाली. ट्रम्प यांनी आता निवृत्त लेफ्टनंट जनरल किथ किलॉग यांची हंगामी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.