अमेरिकेच्या संसदेत मोदीगर्जना नाहीच ?

By admin | Published: August 5, 2014 12:45 PM2014-08-05T12:45:41+5:302014-08-05T12:55:05+5:30

नेपाळ आणि भूटान येथील संसदेत दमदार भाषण करुन आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वांचे लक्ष वेधून घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेच्या संसदेत भाषण करता येणार नाही अशी चिन्हे आहेत.

America's Parliament is not a morcha? | अमेरिकेच्या संसदेत मोदीगर्जना नाहीच ?

अमेरिकेच्या संसदेत मोदीगर्जना नाहीच ?

Next
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ५ - नेपाळ आणि भूटान येथील संसदेत दमदार भाषण करुन आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वांचे लक्ष वेधून घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेच्या संसदेत भाषण करता येणार नाही अशी चिन्हे आहेत. मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिका दौ-यावर जात असून त्यावेळी अमेरिका काँग्रेसमध्ये सुट्टी असते. त्यामुळे मोदींना अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त सत्रात संबोधित करु शकणार नाही असे शक्यता वर्तवली जात आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी काँग्रेसला संबोधित करावे अशी इच्छा अमेरिकेतील काही नेत्यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. मात्र मोदींचा अमेरिका दौरा सप्टेंबरमध्ये असल्याने मोदी अमेरिकी काँग्रेसमध्ये संबोधित करु शकणार नाही. अमेरिकेतील लोकप्रतिनिधी निवडणुकांच्या तयारीसाठी मतदारसंघांमध्ये परतणार आहेत. त्यामुळे मोदी अमेरिकेच्या संसदेला संबोधित करण्याची शक्यता कमीच आहे असे परराष्ट्र खात्यातील एका अधिका-याने सांगितले. मात्र या समस्येवर अमेरिकेतील भारतीयांची यूएस इंडिया पॉलिटीकल अ‍ॅक्शन या समितीने तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. अमेरिकी काँग्रेसच्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावणारे सुमारे ५० सिनेट सदस्य आणि काही राज्यांचे गव्हर्नर यांच्यासोबत मोदींसाठी भोजन समारंभ आयोजित करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे समितीचे रॉबिंदर सचदेव यांनी सांगितले. यासोबतच भारतात गुंतवणूकीसाठी इच्छुक असलेले गव्हर्नर, उद्योगपती यांच्यासोबतही मोदींची भेट घडवून आणू असे सचदेव यांनी नमूद केले. 
दरम्यान, मोदी अमेरिकी काँग्रेसमध्ये संबोधित करु शकले नसले तरी अमेरिकेतील भारतीयांना ते संबोधित करणार आहेत. २८ सप्टेंबर रोजी मोदी न्यूयॉर्कमधील एका मैदानात अमेरिकेतील भारतीयांना संबोधित करतील अशी माहिती भाजपच्या परराष्ट्रसंबंधी विभागाच्या पदाधिका-याने सांगितले. 
 
अमेरिकी काँग्रेस म्हणजे काय ?
भारतात लोकसभा आणि राज्यसभा हे संसदेचे दोन सभागृह असतात. तसेच अमेरिकेतील अमेरिकन काँग्रेस ही संसद आहे. या संसदेत हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट असे दोन सभागृह असतात. या अमेरिकन काँग्रेसला कायदे बनवण्याचे अधिकार दिले आहेत. राष्ट्राध्यक्षांनी केलेली नियुक्ती, महाभियोगाची शिफारस असे महत्त्वपूर्ण निर्णयांना सिनेटची मंजूरी आवश्यक असते. 

Web Title: America's Parliament is not a morcha?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.