‘तेजस’ला अमेरिकेची शक्ती; जीई एअरोस्पेससोबत करार; भारतात उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 05:42 AM2023-06-23T05:42:04+5:302023-06-23T07:04:33+5:30

हा पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यातील मैलाचा दगड मानला जात आहे.

America's power to 'Tejas'; contract with GE Aerospace; Manufactured in India, PM Modi To Join Joe Biden In Rare Press Conference Today | ‘तेजस’ला अमेरिकेची शक्ती; जीई एअरोस्पेससोबत करार; भारतात उत्पादन

‘तेजस’ला अमेरिकेची शक्ती; जीई एअरोस्पेससोबत करार; भारतात उत्पादन

googlenewsNext

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात दोन्ही देशांत मोठे करार होण्याची अपेक्षा खरी ठरली. गुरुवारी अमेरिकेच्या जीई एअरोस्पेसने हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडसोबत (एचएएल) भारतीय हवाई दलातील हलके लढाऊ तेजस जेट विमानाचे इंजिन भारतात संयुक्तरीत्या उत्पादन करण्यासाठी करार केला. हा पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यातील मैलाचा दगड मानला जात आहे.
‘या करारामध्ये जीई एअरोस्पेसच्या एफ ४१४ इंजिनांचे भारतात संयुक्त उत्पादन करण्याची शक्यता समाविष्ट आहे. दरम्यान, दाेन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य बळकट करण्याच्या दिशेने हा करार महत्त्वाचा मानला जात आहे. (वृत्तसंस्था)

‘रीपर ड्राेन’मुळे वाढेल भारताची ताकद
भारत जनरल ॲटॉमिक्स एमक्यू-९ ‘रीपर’ सशस्त्र ड्रोन खरेदी करणार असून नरेंद्र मोदी आणि जो बायडेन याबाबतचा करार जाहीर करणार आहेत. यामुळे भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि हिंदी महासागरात पाळत ठेवण्याची क्षमता तर वाढेलच, पण चीनच्या सीमेवरही ते प्रभावी ठरेल.

रीपरची वैशिष्ट्ये
हे ड्रोन ५००% अधिक भार वाहून नेऊ शकते आणि आधीच्या एमक्यू-१ प्रिडेटरपेक्षा नऊपट अधिक अश्वशक्तीचे आहे. 
नवे ड्रोन दीर्घकाळ तग धरून सतत पाळत ठेवू शकतात. ‘रीपर’ ड्रोन ५०,००० फूट उंचीवर २४० नॉट्समध्ये २७ तास काम करू शकते आणि त्याची भारवाहन क्षमता १७४६ किलो आहे.

‘व्हाइट हाऊस’मध्ये ‘माेदी-माेदी’ जयघाेष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘व्हाइट हाउस’मध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यातर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. रिमझिम पावसात व्हाइट हाउसच्या दक्षिण लॉनवर माेठ्या संख्येने जमलेल्या भारतीय समुदायाने ‘मोदी मोदी’च्या घोषणा सुरू करताच बायडेन मोदींना म्हणाले, ‘व्हाइट हाउसमध्ये परत आपले स्वागत आहे.’ 

लोकशाही डीएनएमध्येच, भेदभावाला जागा नाही
अल्पसंख्याकांच्या अधिकाराबद्दल कोणी विचारले तर मला आश्चर्य वाटते. कारण, भारतात लोकशाही आहे व सरकार लोकशाही मूल्यानुसारच चालते. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्यावर भारताचा विश्वास आहे. जात-पात, पंथ, धर्म वा लिंग या आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही, कारण आमच्या डीएनएमध्येच लोकशाही आहे. भारत- अमेरिका दहशतवादाविरोधातील लढाईत खांद्याला खादा लावून उभे आहेत. 
    - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मोदी यांच्या भेटीने नवे मार्ग प्रशस्त झाले
वृत्तपत्र स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, सहिष्णुता, विविधतेत एकता.... भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. मोदी यांच्याशी याआधीही भेट झाली आहे. आताच्या त्यांच्या भेटीने सहकार्याचे नवे मार्ग प्रशस्त झाले आहेत. आम्ही दोघेही स्पष्टवक्ते आहोत आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करतो. जशी भारताच्या डीएनएमध्ये लोकशाही आहे, तशीच ती अमेरिकेच्याही आहे.
    - जो बायडेन, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका

Web Title: America's power to 'Tejas'; contract with GE Aerospace; Manufactured in India, PM Modi To Join Joe Biden In Rare Press Conference Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.