रशियाच्या नाकाबंदीवर अमेरिकेचे शिक्कामोर्तब
By admin | Published: December 14, 2014 01:33 AM2014-12-14T01:33:53+5:302014-12-14T01:33:53+5:30
जगावर मंदीचे सावट घोंगावत असतानाच अमेरिकी काँग्रेसने युक्रेन मुद्यावरुन रशियाची नव्याने आर्थिक नाकेबंदी करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहे.
Next
वॉशिंग्टन : जगावर मंदीचे सावट घोंगावत असतानाच अमेरिकी काँग्रेसने युक्रेन मुद्यावरुन रशियाची नव्याने आर्थिक नाकेबंदी करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहे.
रशियाच्या आक्रमक भूमिकेला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी युक्रेनला सैन्य उपकरणो देण्यावर शनिवारी संसदेचे एकमत झाले. तिकडे रशियाने अमेरिकी कारवाईला ठोस प्रत्यूत्तर देण्याचा इशारा दिला आहे. रशियाचे परराष्ट्र उपमंत्री सर्गेई रयावकोव्ह म्हणाले की, रशिया नव्या आर्थिक निर्बधांना नक्कीच सडेतोड उत्तर देईल.
उल्लेखनीय बाब म्हणजे, अमेरिकी काँग्रेसने राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना युक्रेनला पूर्व भागात रशियावादी बंडखोरांविरोधात लढण्यासाठी प्राणघातक शस्त्रस्त्रंचाही पुरवठा करण्याचा अधिकार दिला आहे. अशा प्रकारचा पुरवठा करण्यास कायदेशीर अधिकाराची गरज नाही. युक्रेनला दारुगोळा आणि ड्रोन याचा पूरवठा केला जाईल. दरम्यान, गुरुवारी सिनेट व हाऊस ऑफ रिप्रङोंटेटिव्हज यांनी र्निबध प्रस्तावास एकमताने मंजुरी दिली होती. (वृत्तसंस्था)
रशियावर र्निबध लावल्यामुळे ऊर्जा व संरक्षण क्षेत्रतील कंपन्यांवर मोठा परिणाम होणार आहे. रशियाने पूर्व युक्रेनमधील बंडखोरांना पाठिंबा देण्याचे धोरण कायम ठेवल्याने अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.
प्रचंड शस्त्रसाठय़ाची मागणी अधांतरी
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची प्रस्तावावर स्वाक्षरी झाली आहे, याबाबत विचारले असता व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जोश अर्नेस्ट यांनी सांगितले की, आमची या दिशेने वाटचाल सुरु आहे. रशियासोबतच्या संघर्षात अमेरिकेने युक्रेनला पाठिंबा दिला असला तरी प्रचंड शस्त्रसाठा करावा, या युक्रेनच्या मागणीला ओबामा यांनी अद्याप सहमती दर्शविली नाही.
(वृत्तसंस्था)