अमेरिकेतील 'तो' मास शूटर मानसिक रुग्ण; ऐकू येत होते आवाज, वाटत होता आर्मी बेसवर हल्ल्याचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 04:38 PM2023-10-26T16:38:53+5:302023-10-26T16:39:15+5:30
लुईस्टन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमेरिकेच्या रिझर्व्ह फोर्समध्ये असल्याने, त्याने आधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणही घेतलेले आहे.
अमेरिकेतील लेविस्टन येथे तीन ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करून तब्बल 22 जणांचा बळी घेणाऱ्या हल्लेखोराची ओळख पटली आहे. रॉबर्ट कार्ड असे या आरोपीचे नाव आहे. तो मानसिक रोगी असल्याचे सांगण्यात येत आहे. लुईस्टन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमेरिकेच्या रिझर्व्ह फोर्समध्ये असल्याने, त्याने आधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणही घेतलेले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वेळापूर्वीच रॉबर्ड कार्ड मध्ये मेंटल डिसॉर्डरशी संबंधित समस्या दिसून आल्या. कार्डला वेगवेगळे आवाज ऐकू येत होते. एवढेच नाही, तर त्याला लष्कराच्या तळावर हल्ला होण्याची भीतीही वाटत होती. 2003च्या उन्हाळ्यात रॉबर्टला त्याचे मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर दोन आठवडे मेंटल हेल्थ सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. याचाच अर्थ, त्याला शस्त्र बाळगण्याची परवानगीही नसेल.
लेविस्टनमध्ये बुधवारी सायंकाळी 6:56 वाजताच्या सुमारास तीन ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या. जेव्हापासून आतापर्यंत, पोलीस हल्लेखोर रॉबर्ट कार्डचा शोध घेत आहेत. रॉबर्टकडे बंदूक असून, पोलिसांनी त्याला पर्सन ऑफ इंट्रेस्ट म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, ही केस जोवर पुढे सरकत नाही आणि हल्ल्याचे कारण स्पष्ट होत नाही, तोवर हल्लोखोराला पर्सन ऑफ इंट्रेस्टच मानले जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच, हा हल्लेखोर दिसल्यास कुणीही त्याच्या जवळ जाऊ नका, असे आवाहनही पोलिसांनी लेविस्टनसह, संपूर्ण अमेरिकेतील लोकांना केले आहे.
पोलिसांनी जारी केला होता फोटो -
तत्पूर्वी, पोलिसांनी हल्लेखोराचा फोटो जारी करत लोकांकडे मदत मागितली होती. फोटोमध्ये लांब बाह्यांचा शर्ट आणि जीन्स परिधान केलेली एक दाढी असलेली व्यक्ती फायरिंग रायफलने गोळीबार करताना दिसत आहे. यासंदर्भात, लेविस्टनमधील सेंट्रल मेन मेडिकल सेंटरने एक निवेदन जारी करत, या घटनेत " मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू झाला असून जखमींना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. लेविस्टन अँड्रोस्कोगिन काउंटीचा भाग असून मेन मधील सर्वात मोठे शहर असलेल्या पोर्टलँडच्या उत्तरेला जवळपास 56 किमी अंतरावर आहे.