‘आईस बकेट’वर अमेरिकेचे पाणी
By admin | Published: August 24, 2014 02:28 AM2014-08-24T02:28:27+5:302014-08-24T02:28:27+5:30
‘सोशल नेटवर्किग साईटस्’प्रेमींना सध्या झपाटून टाकलेल्या ‘आइस बकेट चॅलेंज’ला अमेरिकेने जोरदार झटका दिला आहे.
Next
वॉशिंग्टन : ‘सोशल नेटवर्किग साईटस्’प्रेमींना सध्या झपाटून टाकलेल्या ‘आइस बकेट चॅलेंज’ला अमेरिकेने जोरदार झटका दिला आहे. परराष्ट्र मंत्रलयाने अमेरिकी राजदूत व उच्चस्तरीय अधिका:यांना या चॅलेंजपासून दूर राहण्याची सक्त सूचना केली आहे.
अमेरिकी परराष्ट्र मंत्रलयाच्या प्रवक्त्या मेरी हार्फ म्हणाल्या की, ही सूचना केवळ राजदूतांसाठी नाही. नियमानुसार, सरकारी अधिकारी अशा गोष्टींमध्ये सहभाग घेऊ शकत नाहीत. अॅमियोट्रॉफिक लॅटरल स्केलिरॉसिस या आजाराशी संबंधित संशोधनास 1क्क् डॉलरची देणगी देण्यासाठीचे हे चॅलेंज जगभरात व्हायरल झाले आहे.
या चॅलेंजमध्ये सहभागी व्यक्तीला अत्यंत थंड पाणी किंवा बर्फाच्या खडय़ाने भरलेली बादली डोक्यावर रिचवून घ्यावी लागते. चॅलेंज स्वीकारणा:या व्यक्तीला इतर तिघांना हे चॅलेंज करावे लागते. जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती आइस बकेट चॅलेंज पूर्ण करून इंटरनेटवर व्हिडिओ अपलोड करत असताना अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी हे चॅलेंज धुडकावून लावले आहे.
माजी सिनेटर रॉबर्ट एफ केनेडी यांच्या 86 वर्षीय पत्नीने ओबामांना हे चॅलेंज दिले होते. (वृत्तसंस्था)