भारतासह अमेरिकेचा जागतिक अजेंडा
By admin | Published: April 10, 2016 02:13 AM2016-04-10T02:13:33+5:302016-04-10T02:13:33+5:30
अमेरिकेचे संरक्षमंत्री अॅश्टन कार्टर भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत असून, ते भारतासह अमेरिकेचा जागतिक अजेंडा असल्याचे आणि त्यात सर्व मुद्दे असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानाशी
न्यूयॉर्क : अमेरिकेचे संरक्षमंत्री अॅश्टन कार्टर भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत असून, ते भारतासह अमेरिकेचा जागतिक अजेंडा असल्याचे आणि त्यात सर्व मुद्दे असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानाशी असलेले अमेरिकेचे संबंध मात्र दहशतवाद आणि आणि अफगाणिस्तानशी निगडित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिकेच्या दृष्टीने भारत व पाक यांच्यात कोणतेही अंतर नाही, असेही कार्टर यांनी स्पष्ट केले आहे. एका वरिष्ठ अमेरिकी थिंक टँक कौन्सिल फॉर फॉरेन रिलेशनमध्ये भारत-अमेरिकेसंबंधांचा पाकवरील परिणाम विचारण्यात आला होता. त्यात ते म्हणाले की, पाक महत्त्वपूर्ण सुरक्षा भागीदार आहे. दहशतवाद हा सर्वात प्रभावी मुद्दा आहे. या महत्त्वाच्या मुद्दावरच पाकसोबत काम करीत आलो आहोत. (वृत्तसंस्था)