पाकिस्तानने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज मागितले, चीनवर विसंबून IMFला ८ अब्ज डॉलर्सची परतफेड करण्याची योजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 20:16 IST2023-07-08T20:16:32+5:302023-07-08T20:16:56+5:30
पाकिस्तानने IMF कडे सादर केलेल्या वित्तपुरवठा योजनेत चीनकडून ३.५ अब्ज डॉलर मिळण्याची चर्चा आहे.

पाकिस्तानने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज मागितले, चीनवर विसंबून IMFला ८ अब्ज डॉलर्सची परतफेड करण्याची योजना
मागील काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे. आयएमएफकडे कर्जासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. पाकिस्तानने परकीय कर्ज फेडण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडे वित्तपुरवठा योजना सादर केली आहे, यामध्ये ८ अब्ज डॉरजची व्यवस्था करण्यात आली आहे. अहवालानुसार, पाकिस्तान सरकारने IMF ला ६ अब्ज डॉलर ऐवजी ८ अब्ज डॉलर विदेशी कर्ज भरण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
"मी टीका करायला नाही, तुमची माफी मागायला आलोय"; पवारांची भावनिक साद
आयएमएफला सादर केलेल्या वित्तपुरवठा योजनेत चीनकडून ३.५ अब्ज डॉलर्स मिळतील असे म्हटले आहे. याशिवाय पाकिस्तानला सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) कडून अनुक्रमे २ अब्ज आणि १ अब्ज डॉलर्स मिळतील.
यासह पाकिस्तानला जागतिक बँकेकडून ५०० मिलियन आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून (AIIB) २५० मिलियन डॉलर्स मिळतील. अर्थ मंत्रालयाच्या अधिकार्यांनी सांगितले की, जिनिव्हा परिषदेत मान्य झालेले ३५० मिलियन डॉलर देखील पाकिस्तानला दिले जाणार आहेत.
२९ जून रोजी, आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला ३ अब्ज डॉलर प्रदान करण्यासाठी पाकिस्तान सरकार आणि IMF यांच्यात आपत्कालीन करारावर स्वाक्षरी करण्यात आली. १२ जुलै रोजी नाणेनिधीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आपत्कालीन कराराचा आढावा घेतला जाईल. मात्र, यासह पाकिस्तान आयएमएफचा चौथा सर्वात मोठा कर्जदार बनणार आहे.
आर्थिक संकटावर मात करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तान सरकारने जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशांतर्गत व्यावसायिक आणि शरिया संचालित बँकांकडून ११.१० लाख कोटी रुपयांचे कर्ज वित्तपुरवठा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.