कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 09:33 AM2024-11-02T09:33:04+5:302024-11-02T09:33:42+5:30

पंतप्रधान कार्यालयातून जारी केलेल्या पत्रकात हिंदू धर्माच्या आचरणाबाबतही उल्लेख

amid heated relations between India and Canada Pm Justin Trudeau wishes happy Diwali to Hindu community | कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...

कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...

Canada India Relations, Justin Trudeau, Diwali 2024: कॅनडा आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या राजकीय तणावादरम्यान, पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडात राहणाऱ्या हिंदू बांधवांना (Hindu in Canada) दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या देशात राहणाऱ्या हिंदूंना त्यांनी सुरक्षिततेचे आश्वासन दिले. कॅनडातील हिंदू बांधवांनी कोणत्याही भीतीशिवाय त्यांच्या धर्माचे पालन आणि आचरण करावे असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपण नोव्हेंबरमध्ये कॅनडामध्ये हिंदूंना वारसा लाभलेल्या सणाचा महिना साजरा करतो. त्यानुसार आपण सर्वजण या समुदायासोबत आनंदाने दिवाळी साजरी करू या.

निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, दिवाळी हा कॅनडातील हिंदू लोकांचा विशेष सण आहे. कॅनडातील हिंदू समाज हा सर्वात मोठा आणि सर्वात वैविध्यपूर्ण स्थलांतरित समाजापैकी एक आहे. हिंदू कॅनडियन लोकांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहू. जेणेकरून ते त्यांचा धर्म मुक्तपणे आणि अभिमानाने आचरणात आणू शकतील.

भारतीय वंशाच्या लोकांच्या योगदानाचे कौतुक

कॅनडाच्या विकासात भारतीय वंशाच्या लोकांच्या योगदानाचे वर्णन करताना ट्रुडो म्हणाले की, आमच्या अविश्वसनीय इंडो-कॅनडियन समुदायाशिवाय कॅनडात दिवाळी शक्य झाली नसती. कलाकार, उद्योजक, डॉक्टर, शिक्षक, व्यवसाय, समुदाय आणि संस्कृती यांसारख्या क्षेत्रात भारतीय-कॅनेडियन लोक कॅनडातील सर्वोत्कृष्ट लोकांचे प्रतिनिधित्व करतात. दिवाळीला आम्ही त्यांनी कॅनडियन समुदायांमध्ये पसरवलेला प्रकाश साजरा करतो. सर्व कॅनडियन लोकांच्या वतीने मी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. दिव्यांचा हा सण आपल्यासाठी आनंद, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो, असेही ट्रुडो यांनी म्हटले.

Web Title: amid heated relations between India and Canada Pm Justin Trudeau wishes happy Diwali to Hindu community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.