Omicron In China: ओमायक्रॉनच्या ऐन संकटात चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट, ४ महिन्यांनंतर एका दिवसात सर्वाधिक रुग्णांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 07:19 PM2021-12-25T19:19:10+5:302021-12-25T19:20:25+5:30
China reports biggest daily surge in Corona cases in 4 months: ओमायक्रॉनच्या वाढत्या संकटात चीनमध्ये शनिवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
China reports biggest daily surge in Corona cases in 4 months: ओमायक्रॉनच्या वाढत्या संकटात चीनमध्ये शनिवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या ४ महिन्यांनंतर चीनमध्ये आज सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर चीनमधील बहुतांश राज्यांमध्ये आता कडक निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. यात सियान शहराचा देखील समावेश आहे. चीनमध्ये एका दिवसात कोरोचे १४० नवे रुग्ण आढळून आले आहेत. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य कमीशननं याची माहिती दिली आहे. याआधी एका दिवसात केवळ ५० ते ५५ रुग्ण आढळून येत होते.
चीनमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण उत्तर-पश्चिम प्रांतातील सियान शहरात आढळून येत आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात लॉकडाऊनचा निर्णय लागू करण्यात आला आहे. यामुळे शहरातील जवळपास १ कोटी ३० लाख लोकसंख्या घरात बंदिस्थ झाली आहे. स्थानिक आरोग्य संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार ख्रिसमसच्या दिवशी शहरात एकाच दिवशी कोरोनाचे ७५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
चीनमध्ये नव्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात विंटर ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन होणार आहे. त्यातच कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येनं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कडक निर्बंध लागू करण्यात आल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचं दिसून आलं होतं. पण पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्यानं प्रशासनाच्या भुवया उंचावल्या आहेत.