अमजद साबरी यांची कराचीमध्ये हत्या
By admin | Published: June 23, 2016 01:42 AM2016-06-23T01:42:40+5:302016-06-23T01:42:40+5:30
प्रख्यात कव्वाली गायक अमजद साबरी (वय ४५ वर्षे) यांची बुधवारी कराचीमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आणखी दोन जणही गोळीबारात मरण पावले.
कराची : प्रख्यात कव्वाली गायक अमजद साबरी (वय ४५ वर्षे) यांची बुधवारी कराचीमध्ये गोळ्या
झाडून हत्या करण्यात आली. आणखी दोन जणही गोळीबारात मरण पावले.
कराचीजवळील लिकाताबाद भागात ते कारने जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात इसमांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर अमजद साबरी व त्यांच्या सहकाऱ्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे ते मरण पावले. अमजद साबरी यांच्या छातीत व डोक्यात गोळ्या शिरल्या होत्या, असे कराची पोलिसांनी सांगितले.
प्रख्यात कव्वाल गुलाम फरीद साबरी यांचे ते पुत्र. साबरी बंधूंच्या कव्वालीने केवळ पाकिस्तानातच नव्हे, तर आशिया खंडालाही वेड लावले होते. सुफी ढंगातील गायकी आणि कव्वालीमुळे अमजद साबरी विशेष लोकप्रिय होते. भर दे झोली मेरी या मुहम्मद, मेरा कोई नही तेरे सिवा, करम मांगता हूं, अल्लाह हूं अल्लाह हूं, दमा दम मस्त कलंदर, ख्वाजा की दिवानी या कवाल्यांना तर कमालीची लोकप्रियता मिळाली.