आंध्र प्रदेशच्या अम्मा भारताच्या सर्वात वयस्कर यूट्यूबर

By Admin | Published: April 28, 2017 01:58 AM2017-04-28T01:58:38+5:302017-04-28T01:58:38+5:30

शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते, असे म्हणतात. माणसाला केवळ शिकण्याची ओढ असायला हवी. तो कोणत्याही वयात काहीही शिकू शकतो.

Amma of Andhra Pradesh, India's oldest Utube | आंध्र प्रदेशच्या अम्मा भारताच्या सर्वात वयस्कर यूट्यूबर

आंध्र प्रदेशच्या अम्मा भारताच्या सर्वात वयस्कर यूट्यूबर

googlenewsNext

शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते, असे म्हणतात. माणसाला केवळ शिकण्याची ओढ असायला हवी. तो कोणत्याही वयात काहीही शिकू शकतो. याचे चालते-बोलते उदाहरण म्हणजे १०६ वर्षांच्या या ‘अम्मा.’ आंध्र प्रदेशच्या रहिवासी असलेल्या मस्तनम्मा यांचा सध्या इंटरनेटवर बोलबोला आहे. कारण आहे त्यांचे भारताच्या सर्वात वयस्कर यूट्यूबर असणे. होय, यूट्यूबवर मस्तनम्माच्या कामाची खूप प्रशंसा होते. यू ट्यूबवर कंट्रीफूड नावाचे त्यांचे चॅनल आहे. त्यांचा नातू लक्ष्मण हे चॅनल चालवितो. लक्ष्मणच त्यांचे व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट करतो. मस्तनम्मा यांना स्वयंपाकाची आवड आहे. तुम्ही त्यांचे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला त्यांचे त्यांच्या कामावरील प्रेम दिसून येईल. त्या अत्यंत सहजपणे हे सर्व करतात. मस्तनम्मा चॅनलचे जवळपास २,५४,५२५ सबस्क्रायबर आहेत. त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येक व्हिडिओवर व्ह्यूजची संख्याही मोठी आहे. त्यांचे काही व्हिडिओतर दहा लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत. कंट्रीफूड चॅनलवर तुम्हाला मस्तनम्माच्या चविष्ट रेसिपी मिळतील. मस्तनम्मा यांना प्रेमाने सर्व जण ग्रॅनी म्हणतात. त्या याच नावाने प्रसिद्ध आहेत. आता ग्रॅनी त्यांच्या गावातच नाहीतर यूट्यूब जगतातही स्टार बनल्या आहेत.

Web Title: Amma of Andhra Pradesh, India's oldest Utube

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.