BREAKING: लडाखपासून थेट जपानपर्यंत जमीन हादरली! टोकियोमध्ये ७.३ रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामीचा अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 09:28 PM2022-03-16T21:28:38+5:302022-03-16T21:28:58+5:30
लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी मोजण्यात आली आहे. जपानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता तब्बल 7.3 इतकी होती.
लडाखमध्येभूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, लडाखमध्ये संध्याकाळी ७.०५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर पडले. सध्या या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर आलेलं नाही. मात्र, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूकंपाची खोली 110 किमी, रेखांश 75.18 पूर्व आणि अक्षांश 36.01 उत्तरेकडे होती.
जपानमध्ये भूकंपाचे तीव्र झटके
जपानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता तब्बल 7.3 इतकी होती. भूकंपाच्या धक्क्याने जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनीच्या हवाल्याने समोर आलेल्या माहितीनुसार, जपानमधील भूकंपानंतर सुमारे वीस लाख घरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र फुकुशिमा प्रदेशाच्या किनारपट्टीपासून 60 किमी खोलीवर होते आणि स्थानिक वेळेनुसार रात्री 11.36 वाजून 10 मिनिटांनी भूकंपाच्या काही भागांमध्ये एक मीटरच्या त्सुनामीच्या लाटा येण्याचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपामुळे आण्विक आपत्ती देखील आली. भूकंपामुळे मालमत्तेचे नुकसान झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. यापूर्वी 22 जानेवारी रोजी जपानच्या नैऋत्य आणि पश्चिम भागात झालेल्या भीषण भूकंपामुळे 10 हून अधिक लोक जखमी झाले होते. शनिवारी दुपारी १.०८ वाजता भूकंप झाला. स्पुतनिक या रशियन वेबसाइटने स्थानिक मीडियाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
जपानच्या हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार, क्यूशू बेटाजवळ 1 वाजून 2 मिनिटांनी भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू 40 किलोमीटर (24.8 मैल) खोलीवर होता. त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. जपानच्या क्योडो वृत्तसंस्थेनुसार, मियाझाकी, ओटा, कोची आणि कुमामोटो प्रांतांनी भूकंपाला पाच-पॉइंट रेटिंग दिले होते.